मुख्य सामग्रीवर वगळा

 


•  डॉ.संदिप चव्हाण यांची आरोग्यगाथा

•  उमेद, ऊर्जा आणि उपचार 


               : लेखक :  

    • प्रविण शकुंतलाई बाबुलालजी हटकर

            Mob. 80552 13281


       डॉ.संदिप चव्हाण — हे नाव उच्चारलं की डोळ्या  समोर येतो एक तेजस्वी चेहरा, डोळ्यात करुणा, हृदयात माणुसकी, आणि कार्यात अविरत झोकून देणं. त्यांनी निवडलेली वाट सोपी नव्हती. एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य व्यक्तिमत्वाचा प्रवास प्रारंभ करून खाचखळग्यांनी भरलेली, संघर्षांनी सजलेली वाट तुडवत जाणं आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करणं निश्चितच सोपं नाही ... पण त्यांनी हार मानली नाही. कारण...

अंधारल्या वाटा

तेजोमय होती ।

संदिप चालती

जी जी वाट ।।

जिथे अंधार होता, तिथे त्यांनी आशेचा दिवा लावला. जिथे भय होतं, तिथे विश्वासाचं पाणी शिंपडलं. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी केवळ उपचार केले नाहीत, तर हजारो - लाखो माणसांना आयुष्याची नवी दिशा दिली जगण्याची... कुणाल औषधीच्या तर कुणाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात जेव्हा साऱ्या जगाने भीतीच्या सावटाखाली डोळे मिटले होते, तेव्हा डॉ.चव्हाण सरांनी जिल्ह्यातीलच  नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक भागामध्ये अंदाजे 3,50,000 लोकांपर्यंत मोफत आर्सेनिक होमिओपॅथीक औषध पोहोचवलं. हे फक्त एक वैद्यकीय अभियान नव्हतं – ही होती श्रद्धा, सेवा आणि शुद्ध माणुसकीची पूजा !आणि ते नुसते होमिओपॅथी पुरतेच मर्यादित नाहीत तर ते लहानांन पासन थोरा मोठ्या पर्यंत बैठक असणारे, साहित्यिकांच्या मांदियाळीत सहज मिसळतात, सांस्कृतिक कार्यक्रमांत रंग भरतात, आणि सामाजिक चळवळीत आपले खांदे सहज उभे करतात जबाबदारी पेलण्याकरिता तसेच उद्याच्या समाज हिताकरिता राजकारणाच्या चर्चांमध्येही त्यांचं आकलन अगदी अचूक सडेतोड आणि स्पष्ट असतं – पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एकच प्रेरणा, एकच उद्देश –ते म्हणजे समाजहित!आजच्या घडीला त्यांनी केनवड ( जिल्हा - वाशिम) आणि शिवर, पाटखेड, माझोड ( जिल्हा -अकोला) यासारखी अनेक गावे आरोग्य सेवेकरिता दत्तक घेतली आहेत ही केवळ सेवा नाही – ही त्या गावांच्या वेदनांशी एकरूप होण्याची त्यांची तयारी आहे, सोबतच जिल्ह्यातील गजानन महाराज संस्थान शिवर असो वा लॉयन्स क्लब इंटरनॅशनल, इंडियन रेड क्रॉस सोसायटी सारख्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थां असो यांच्या माध्यमातून केवळ सामाजिक सेवेच्या भावनेतून ते सदैव तत्पर असतात याचा देखील अनेक वेळा आपण अनुभव घेतच आहोत त्यांचं सातत्याने वाचन, चिंतन, आत्मपरीक्षण आणि नव्याला आकलन करून नवीन काहीतरी शिकण्याची उमेद – ही त्यांची खरी ओळख आहे. 



ते विद्यार्थ्यांना केवळ करिअरचा सल्ला देत नाहीत, तर त्यांच्या स्वप्नांना विश्वासरुपी पंख देऊन जीवन जगण्याची नवीन दिशा देतात.  आरोग्यावर बोलू काही” या त्यांच्या कार्यक्रमातून ते जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्नांना एक सखोल आणि प्रेमळ उत्तर देतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर योग्य प्रकाश टाकताना,  विज्ञान आणि अध्यात्म यांचा संतुलित संगम त्यांच्या जीवनशैलीतून निश्चितच जाणवतो – कारण ते केवळ शरीर नाही, तर मनावर उपचार देतात.  डॉ.संदिप चव्हाण हे केवळ एक वैद्यकीय तज्ञच नाहीत तर,  ते एक प्रेरणा आहेत,एक चैतन्याचा प्रवाह,आणि समाजातील युवकांकरिता एक आदर्श !    लेखक हे अभिनेता, दिग्दर्शक,  अभंगकार आहेत.)

             00000




         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...