• मा.रवींद्र चव्हाण राजेश्वरनगरीत
• विदर्भातील नऊ जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संघटनात्मक आढावा
अकोला :
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण राजेश्वर नगरीमध्ये 26 एप्रिल रोजी हिंगोली येथून रात्री नऊ वाजता अकोल्यात येत आहेत. रविवार दि. 27 एप्रिल रोजी पश्चिम विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बाराशे 42 कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व संघटनात्मक आढावा संघटन पूर्व व गाव वस्ती अभियाना संदर्भात आढावा घेणार आहेत. प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक सिटी स्पोर्ट मुर्तीजापूर रोड येथे ही बैठक होत आहे.
या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्ष, तसेच प्रत्येक जिल्ह्यातून शंभर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी अपेक्षित असून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर, नामदार अशोक उईके, खासदार अनुप धोत्रे खासदार, अनिल बोंडे, नवनीत राणा, जिल्ह्यातील आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रवीण तायडे, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पाच आमदार श्वेताताई महाले, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चेनसुख संचेती या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
तसेच संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होणार असून नोंदणी झाल्यानंतर दहा वाजता बैठकीला आरंभ होणार असून बैठकीच्या समारोप नंतर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण गाव वाडी संपर्क अभियानांतर्गत पातुर तालुक्यातील गवाडगाव या गावाला भेटी देणार आहेत. त्यानंतर नागपूरला जाणार आहेत.
राज राजेश्वर यांना नमन करून तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत ते चर्चा विनिमय करणार आहेत. आगमन व स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची टीम जय्यत तयारीला लागली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा