भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत 4 गोल्ड,4 सिल्वर मेडल,1 ब्राँझ मेडल प्राप्त केले
शालेय क्रीडा स्पर्धेत भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या खेळाडूंचे सुयश
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक बॉक्सिंग व कुस्ती स्पर्धेत भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत 4 गोल्ड,4 सिल्वर मेडल,1 ब्राँझ मेडल प्राप्त केले.
पियुष शेंडगे, दीपक पवार, विश्वदीप गोपनारायण,अथर्व सानप यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले. ओम मेहरे,चिंना इंगळे, पियुष भोजने, प्रज्वल डोंगरे यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले, तर आदित्य वानखडे ब्राँझ मेडल प्राप्त केले.
तसेच अवनी ग्लोबल फाऊंडेशन तर्फे आयोजित आजीबाईचा बटवा विज्ञान मॉडेल प्रतियोगिता मध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सहभाग नोंदविला. त्यांना डाॅ. श्रीवास्तव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विजयी खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ताराताई हातवळणे, उपाध्यक्ष श्री नाना कुलकर्णी, सचिव श्री गोपाल खंडेलवाल, आ.श्री वसंत खंडेलवाल तसेच सर्व संचालक मंडळ आणि
शाळेचे मुख्याध्यापक अभय वानखडे सर, उपमुख्याध्यापक रवींद्र राठोड सर, पर्यवेक्षक रमेश धुळे सर,तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना शाळेच्या क्रीडा शिक्षिका सौ मंगला भोपळे व प्रभुदास बावणे यांचे मार्गदर्शन लाभले.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा