मुख्य सामग्रीवर वगळा
"बदलाची लहर: भारतातील दलित महिला पत्रकारांचा उदय" 
              लेखक
            प्रा. राहुल गोवर्धन माहुरे
         शांतीनगर, जुनेशहर, अकोला 
            मोबा. 9822278925
 खरं पाहता दलित शब्द वापरु नका असे लोक म्हणतात परंतु जे सत्य आहे त्याला काही केल्या नाकारता येत नाही. जी ‘जात’ नाही ती ‘जात’ यासारखे दलित शब्दाचे झाले आहे. असो..
    आरक्षणाच्या नावाने जे लोक बोटं मोडतात ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात त्यांना एक गोष्ट सांगायला पाहीजे स्पर्धा किंवा बरोबरी ही नेहमी समान तुल्यबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये होत असते. हजारो वर्षांपासून ज्यांना माणुस म्हणून ही स्विकारल्या गेले नव्हते  निसर्ग निर्मीत पाण्यासाठी ज्यांनी संघर्ष करावा लागला. आम्ही देखील मानव आहोत हे सांगण्यासाठी हजारो वर्षे सतत लढा द्यावा लागला. त्या लोकांना शिक्षण कशाशी खातात हे ही माहीत नव्हते डॅा बाबासाहेब आंबेडकर यांना ही शाळेच्या बाहेर बसुन शिकावे लागले. हि गोष्ट साधी नाही भारत देशाला कलंक आहे. तरीही कुठलाही आकस न बाळगता संपूर्ण देशाला एका समतेच्या बंधुतेच्या धाग्याने एकत्र ठेवुन जगात सर्वश्रेष्ठ असणारी लोकशाही संविधानाच्या माध्यमातून देशाला दिली ही पृथ्वीवरील एक सर्वात मोठी घटना आहे. डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हा संपूर्ण समाज मुख्य प्रवाहात आला थोडं फार शिकु लागला  मेंदू इतका तल्लख की शिक्षणाच्या क्षेत्रात ते इतके पुढे निघाले की आज लोकांच्या पोटात दुखत आहे. राजकारणासाठी उपवर्गीकरणाची भाषा बोलत आहेत. 
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, तुमच्या मुक्ती चा आणि कल्याणाचा मार्ग म्हणजे केवळ ‘शिक्षण’आहे. इतक्या हजारो वर्षांचा बॅकलॅाग एवढ्या लवकर भरून निघेल का??? हा माझा प्रश्न आहे जे आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांना…
यवतमाळ चा १९ वर्षांचा मुलगा आत्महत्या करतो.एक आई आपल्या पोटचा गोळा गमावते त्याबद्दल आजच्या चॅट जीपीटी मध्ये वावरणाऱ्या समाजाला काहीचं वाटत नाही. 
 कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसताना साहील मोबाईल मध्ये कॅापी करत होता याचे समाज माध्यमांवर प्रसारित झालेले व्हिडिओ पाहून त्याची चर्चा करतात. तो व्हिडिओ खरा आहे कि नाही याची काहीही शहानिशा न करता आपण स्टेटमेंट पास करतो???  कुठे हरवली  संवेदना ?? रितीका शर्मा नावाची डॅशिंग पत्रकार देशात ज्वालामुखी चा उद्रेक व्हावा अशी बातमी समोर आणते भारताच्या निवडणूक आयोगाने केलेला भ्रष्टाचार देशासमोर उघडकीस आणुन आपल्या कर्तव्याची जाणीव आणि देशाप्रति असणाऱ्या निष्ठेचे एक आदर्श उदाहरण घालुन देते. 
ह्या दोन्ही घटना मनात आणि डोक्यात घोळत असतांना विचार आला आज महिला पत्रकारांमघ्ये दलित महिला पत्रकार आहेत की नाही? आहेत तर किती? किंवा नाहीतचं…संशोधनाअंती असे निदर्शनास आले की, 
आधी तर संपूर्ण स्त्री जातीला कुठलेही अधिकार नव्हते. त्यातल्या त्यात दलित स्त्री चा तर विचार न केलेला चं बरा अशातही दलित महिलांचा पत्रकारितेतील प्रवास बघता "अनुपस्थितीतून स्वयं-संघटन" अशा स्वरूपाचा आहे. याचा अर्थ असा “कोणत्याही बाह्य नियंत्रकाच्या अनुपस्थितीत स्वतःहून संघटित होणे किंवा व्यवस्था तयार करणे"
स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार करता असं लक्षात येते की, प्रत्येक बाबतीत संपूर्ण स्त्री जातीला चं मुख्य प्रवाहातुन नेहमीचं पद्धतशीरपणे बाहेर ठेवल्या गेले. याचे अनेक दाखले आपल्याला इतिहासात मिळतात. ‘चूल आणि मुल’ या बाहेर तिचे फारसे अस्तित्व नव्हते. शिक्षण, पत्रकारिता हे तर गीणतीतचं नव्हते. 
आज २०२६ मध्ये देखील ही मानसिकता फारशी बदललेली दिसत नाही. असो…पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अत्यंत दुर्मिळ व्यक्ती ऐतिहासिक नोंदींमध्येही जवळपास नामशेष झालेल्याचं आढळून येतात. आधुनिक काळात दलित महिलांनी पत्रकारिता आणि स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केल्याचे आणि जातीविरोधी व स्त्रीवादी पत्रकारितेचा एक अद्वितीय महामार्ग चं तयार केल्याचे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व भारतात दलित महिलांच्या पत्रकारिता व प्रकाशन कार्यांची नोंद दुर्मिळ आहे. परंतु काही निवडक महिला दलित पत्रकार यामध्ये दिसुन येतात…
"श्रीमती मोहिनी चमारिन" १९१५ मध्ये यांची कथा  "छोटे का चोर"  ही कथा ऑगस्ट १९१५ मध्ये अलाहाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या "कन्या-मनोरंजन" या नियतकालिकात प्रकाशित झाली होती जी अवधी भाषेत लिहिली गेली होती. ही रचना केवळ हिंदीतील पहिली दलित कथा मानली जात नाही तर अवधी भाषेतील पहिली प्रकाशित दलित रचना देखील आहे. ज्या प्रदेशात चांभार स्त्रियांच्या निरक्षरतेचा दर ९९.९९% होता. अशा काळात हे प्रकाशन एक मैलाचा दगड चं मानावा लागेल. मात्र काळाच्या ओघात श्रीमती मोहिनी चमारिन हे नाव पुरुषसत्ताक दलित साहित्यिक आख्यायिकांमध्ये हरवून गेले. यामध्ये महत्वाची घटना अशी घडली विश्वरत्न 
डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० मध्ये  ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरु केले. जे भारतीय दलित पत्रकारितेची सुरुवात मानली जाते. त्यानंतर मात्र दलित महिला पत्रकारासंदर्भात काही नोंदी नाहीत. 
वर्ष २००२ हे भारतीय दलित महिला पत्रकारितेच्या इतिहासातील निर्णायक वर्ष ठरले. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात  ‘खबर लहरिया’ ची स्थापना झाली. 
भारतातील पहिले आणि एकमेव पूर्णतः दलित महिलांद्वारे संचालित वृत्तपत्र म्हणून ते प्रसिद्ध आहे.  ग्रामीण साक्षरता कार्यकर्त्या मीरा जाटव यांच्या नेतृत्वाखाली एन जी ओ निरंतर यांच्या पाठिंब्याने सुरू झाले.यामध्ये ग्रामीण दलित, मुस्लिम आणि आदिवासी महिलांना पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या महिला सुरुवातीला बुंदेली व अवधी सारख्या स्थानिक बोलींमध्ये हस्तलिखित वृत्तपत्र तयार करत होते आणि स्त्री वादी दृष्टिकोन स्वीकारून, जातीय आणि लैंगिक हिंसा तसेच सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील अंतर यांसारख्या ग्रामीण समस्या मांडत होत्या यांतील काही स्त्रिया जेमतेम शिकलेल्या किंवा पूर्णपणे निरक्षर होत्या. कविता देवी या संस्थेच्या एक दलित महिला पत्रकार आहेत. त्या भारतीय संपादक गिल्ड ‘एडीटर्स गिल्ड ॲाफ इंडिया’मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत. त्या ‘चंबळ मीडिया’ च्या 
सी ई ओ देखील आहेत. त्यांनी ‘खबर लहरिया’ ला आठ-पृष्ठीय स्थानिक वृत्तपत्रावरून मासिक १ कोटी दर्शकसंख्या असलेल्या डिजिटल नेटवर्कमध्ये रूपांतरित केले. ‘खबर लहरिया’ ला २००९ मध्ये युनेस्को राजा सेजोंग साक्षरता पुरस्कार देखील मिळाला आहे. ‘खबर लहरिया’ ची कथा  ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटात मांडली ज्याला ऑस्कर नामांकन मिळाले.खरं पाहता  ‘खबर लहरिया’ केवळ माध्यमच नाही तर सामाजिक चळवळ आहे. ज्यामुळे "गावातल्या मुली" अशी संबोधली जाणारी स्त्री आता "प्रतिष्ठित पत्रकार" बनली आहे. आणि सत्ता संरचनेवर प्रश्न विचारत आहे.
वर्षे २०२० नंतर दलित महिला पत्रकार सामूहिक मॉडेलच्या पुढे जाऊन वैयक्तिकरित्या किंवा लहान गटांमध्ये स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म चालवून विविध विषयांमध्ये पत्रकारिता करायला लागल्या.त्यातील काही प्रमुख आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला पत्रकार आहेत त्यामध्ये  
मीना कोटवाल त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील पहिल्या पदवीधर आहेत. बीबीसी मध्ये काम करताना जातीय भेदभावाच्या बळी ठरल्या दलित पत्रकार म्हणून आपल्या आव्हानांबद्दल सार्वजनिकपणे लिहिल्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये रोजगार मिळाला नाही. २०२१ मध्ये त्यांनी ‘दि मूकनायक’ वेबसाइट आणि ‘यु-ट्यूब’ चॅनेलची स्थापना केली. ज्याचे नाव डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’ वरून ठेवले. एकाच वर्षात पत्रकारिता क्षेत्रातील महत्वाच्या दोन भिन्न श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या पत्रकार ठरल्या त्यांचा असा विश्वास आहे की, "इतिहास बदलेल" जे लोक भूतकाळात इतिहास लिहू शकत नव्हते ते आता स्वतःचा इतिहास लिहू शकतील.
तनुश्री पांडे ‘इंडीया टुडे’  मध्ये असताना त्यांनी २०२० च्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचे वृत्तांकन केले. ज्यात पोलिसांनी रात्री जबरदस्तीने दहन केल्याची कारवाई नोंदवली.  या रिपोर्टिंगमुळेच हाथरस प्रकरण राष्ट्रीय स्तरावर पोहचले. त्यांना २०२३ मध्ये मानाचा रामनाथ गोयनका पुरस्कार (सर्वोत्तम तपासणी श्रेणी) मिळाला. 
सुकन्या शांता यांनी ‘दि वायर’साठी भारतीय तुरुंगांमधील जातीय भेदभावावर सखोल तपास शृंखला प्रकाशित केली होती ज्यात जातीच्या आधारावर कैद्यांना अपमानास्पद काम देण्याचे वृत्तांकन केले. या अहवालामुळे सार्वजनिक हिताचा दावा दाखल झाला. आणि २०२४ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगांमधील जातीय भेदभाव असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला आणि सर्व राज्यांना नियमावलीत सुधारणा करण्याचे आदेश दिले. या कामासाठी त्यांना २०२१ मध्ये 'के.पी. नारायण कुमार स्मृती पुरस्कार' आणि २०२२ मध्ये 'फेटिसोव्ह पत्रकारिता पुरस्कार' मिळाला. 
 यशिका दत्त एक लेखिका व पत्रकार ज्यांनी २०१६ मध्ये रोहित वेमुला यांच्या आत्महत्येनंतर ‘टुडे आय ॲम कमींग आऊट ॲज दलित’ हा ब्लॉग लिहिला ज्यात त्यांनी लपवलेली दलित ओळख जाहीर केली. यानंतर त्यांनी "डाक्युमेंट्स ॲाफ दलित डिस्क्रीमिनेशन’ हा ब्लॉग सुरू केला 
जो दलितांसाठी सुरक्षित विचारपीठ ठरला. त्यांचे लेख ‘न्युयॅार्क टाइम्स’, ‘फॅारेन पॅालीसी’ सारख्या जगप्रसिद्ध माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
एकूणचं दलित महिला पत्रकारितेचा इतिहास दर्शवतो की आजही त्यांना मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये जातीय भेदभाव आणि बहिष्कार सहन करावा लागत आहे. गुणवत्तेपेक्षा जाती मुळे संधी डावलल्या जात आहे.सर्व दलित महिला पत्रकारांनी दाखवून दिले की, त्यांचे योगदान केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नाही तर ते सामाजिक न्यायाच्या लढ्याचा भाग आहेत. दलित महिला पत्रकारांचा प्रवास संघर्ष आणि पराक्रम या दोन्हींनी भरलेला आहे. जातीय भेदभाव आणि पितृसत्ता या दुहेरी बेड्या तोडत त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दलित महिला पत्रकारांचा आवाज केवळ त्यांच्यासाठी नाही तर संपूर्ण लोकशाहीसाठी अनिवार्य आहे. भारतीय माध्यमांच्या २०० वर्षांपेक्षाही जास्त इतिहासात अद्याप एकही महिला दलित संपादक नाही. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. दलित महिला पत्रकार ह्या केवळ बातम्या देत नाहीत तर त्या आजच्या समाजाचा आरसा आहेत. त्यांच्या संघर्षातून आणि यशातून भारतीय लोकशाहीची खरी ताकद दिसून येते. त्यांच्या आवाजाला बळ देणे हे प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...