अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी लुटला नवरात्र -गरबा नृत्य आनंद
विद्यार्थ्यातील नृत्य कला प्रोत्साहीत करणारा उत्सव : पीएसआय सौ.मालती कायते
अकोला :
भारतीय संस्कृतीतील सर्वच धर्म पंथ यामधील उत्सव हे मानवाला आनंद निर्माण करून देणारे प्रवाह असून विद्यार्थी जीवनात या उत्सवांचे आयोजन हे आपल्यातील कला गुणांना प्रोत्साहीत करणारे असावे, असे भावार्थ विश्लेषण अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या अधिकारी पीएसआय
सौ. मालती कायते यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थानिक बाभूळगांव येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झालेल्या नवरात्र उत्सवाच्या गरबा नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात पी एस आय मालती कायते यांनी उद्धाटक या नात्याने विद्यार्थ्यांना शिस्त व कायदा याबाबतही मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात तथा प्रमुख अतिथी या नात्याने सौ.अपर्णा शिरीषराव धोत्रे तथा सौ. दिपाली प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम शुभारंभा अगोदर सर्व पाहुण्यांनी एकत्रितपणे परिसरातील शिक्षण महर्षि डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पूर्णा कृती पूतळ्याचे पूजन करून वृक्षारोपण या राष्ट्रीय कार्यक्रमाची कृतीने पूर्तता केली.
उद्घाटन समारंभादरम्यान विश्व मांगल्य सभा अखिल भारतीय धर्म शिक्षा विभाग प्रमुख सौ. वअपर्णाताई धोत्रे यांनीही स्त्रीजीवनावर संक्षिप्त तथा सखोल मार्गदर्शन केले. आयोजकांच्या विनंतीस्तव
सौ. दिपालीताई थोरात व सौ अपर्णाताई धोत्रे यांनी या गरबा नृत्य स्पर्धेचे परीक्षण करून तथा स्पर्धेचे बक्षीस वितरण करून कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले.
स्पर्धेमध्ये एकूण एकशे दहा मुलींनी आकर्षक तथा पारंपारीक वेषभूषेसह उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून उपक्रमाचा येथेच्य आनंद लुटला. संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन केमीकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थीनी बतुल अलमदार यांनी तथा आभार प्रदर्शन उपक्रम आयोजक प्रा दुष्यंत झामरे यांनी केले.
या उपक्रमासाठी गठीत समिती सदस्य प्रा. डॉ अमित गावंडे, प्रा. शाहू चोरे, प्रा.अक्षय काळमेघ, प्रा .कल्याणी बारब्दे , प्रा .शारदा देशमुख प्रा.प्रिया तायडे, प्रा. अनघा तायडे, प्रा.राहुल भूतडा प्रा. सुधीर ढोमने, प्रा.शशिकांत ठाकरे, प्रा.महेश पुंडकर व विद्यार्थी कु.दिशा श्रीवास्तव, कु.हर्षदा माहुलकर, कु.वैभवी बंड, कु. रिया अंभोरे, कु.देविका कुकड़े, कु.श्रावणी रेखे यांचेसह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख तथा प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ थोरात यांचे प्रमुख मार्गदर्शनात केलेले चौफेर सहकार्य हे कार्यक्रम यशस्वितेचे वैशिष्ट ठरले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा