शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टातच प्रखर लढा देऊ : प्रकाश पोहरे
विविध संघटनांद्वारे " कृषी योद्धा " प्रकाश पोहरे यांचा भावपूर्ण सत्कार
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टातच प्रखर लढा देऊ : प्रकाश पोहरे
अकोला :
शेतकऱ्यां प्रति शासनाची संवेदना शून्य वृत्ती, वारंवार येणारी नैसर्गिक संकटे आदींमुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहेत. या समस्या सोडविण्यासाठी कितीही आंदोलने केली तरी पाहिजे तसे यश मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन आता लवकरच एका जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टातूनच या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू. असे प्रतिपादन शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केले
भारतीय किसान परिसंघाच्या (शिफा) राष्ट्रीय सचिव पदावर प्रकाश पोहरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्थानिक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आज त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. आपल्या या सत्कारास उत्तर देताना प्रकाश पोहरे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषी नेते महादेवराव भुईभार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, शेकापचे नेते भाई प्रदीप देशमुख उपस्थित होते. अतिथी म्हणून दैनिक देशोन्नतीच्या संचालिका साधनाताई पोहरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे, माजी अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिर साहेब, शिवप्रसाद रुहाटिया उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली.
प्रकाश पोहरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टात जी जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, त्यात आपण प्रख्यात विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्या सहकार्याने स्वतः बाजू मांडणार आहोत. म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यांमधील अधिक बारकावे अभ्यासपूर्ण पद्धतीने कोर्टासमोर मांडता येतील. ते पुढे म्हणाले की 2007 ते 2022 या 15 वर्षाच्या कालावधीत शासनाने शेतकऱ्यांच्या धान्यास अतिशय कमी प्रमाणात मोबदला दिला आहे. त्यात तांदुळास 24 लाख कोटी तर गव्हास 21 लाख कोटी रुपये कमी देण्यात आले आहेत. इतर धान्यास सुमारे 16 लाख कोटी रुपये कमी देण्यात आले आहेत. हे 61 लाख कोटी रुपये आजही शासन शेतकऱ्यांना देणे लागते.
माजी मंत्री अजहर हुसेन आपल्या भाषणात म्हणाले की, प्रकाश पोहरे आता केवळ राज्यपातळीवरील शेतकरी नेते राहिले नसून ते आता देश पातळीवरील एक प्रमुख शेतकरी नेते झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांची मोलाची मदत होईल. माजी आमदार लक्ष्मणराव तायडे आपल्या भाषणात म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू समजून जोपर्यंत त्यांच्या समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होणार नाही. भाई प्रदीप देशमुख म्हणाले की, निर्भीड लिखाण करण्यात प्रकाश पोहरे यांचा हात कुणीही धरू शकत नाही. ते कुणाला भीतही नाहीत. त्यांच्या या लिखाणाचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे. महादेवराव भुईभार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, प्रकाश पोहरेयांनी मागील सुमारे चार दशकांपासून शेतकऱ्यांच्या समस्यांचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ते शासना पुढे अधिक अचूकपणे मांडू शकतात. प्रा. किशोर बुटले यवतमाळ यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रकाश पोहरे यांना
भव्य सन्मानपत्र अर्पण
या सत्काराच्या निमित्ताने सत्कार करणाऱ्या या सर्व संघटनांच्या वतीने प्रकाश पोहरे यांना एक भव्य सन्मानपत्र अर्पण करण्यात आले. अ. भा. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे यांनी लिहिलेले व अविनाश पाटील यांनी तयार केलेले हे भव्य सन्मानपत्र या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या मानपत्राचे वाचन प्रदीप खाडे यांनी केले. आज पासून प्रकाश पोहरे यांना " कृषी योद्धा " ही नवीन सार्थ उपाधी बहाल करीत असल्याची घोषणा याप्रसंगी खाडे यांनी केली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा संघटना, अ. भा. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, कुणबी समाज विकास मंडळ, देशमुख समाजसेवा मंडळ, पाटील समाज अकोला, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, किसान ब्रिगेड, आस्था योग फाउंडेशन, समता परिषद, महाराणा प्रताप प्रगतिशील मंडळ, विदर्भ कॅरम असोसिएशन, बहुजन पत्रकार संघ, कच्ची मेमन जमात, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, जमाते इस्लामी हिंद, प्रकाश पोहरे मित्र मंडळ आदींनी संयुक्तपणे केले होते.
कार्यक्रमास किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे, जिल्हाध्यक्ष किशोर हिंगणे, अ. भा. लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप खाडे, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, मेडिकल असोसिएशनचे संजय देशमुख, छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, अशोक पटोकार, अविनाश पाटील. धनंजय मिश्रा, सुनील जानोरकर, प्रदीप चोरे, ऍड. सुभाष सिंह ठाकुर, राम मुळे, चंद्रकांत अवचार, प्रभुजितसिंग बछेर, मनोहरराव हरणे, समाधान जगताप, जावेद झकेरिया , गजानन हरणे, विनायकराव पवार, दादाराव पात्रीकर, प्रदीप गावंडे, मधुकरराव देशमुख, दिवाकर पाटील, पंकज जायले, तुषार जायले, श्रीकांत खाडे, संजय मालोकार, राजेश देशमुख चरणगाव, शरद वानखडे, रामेश्वर सपकाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या इंदुमती देशमुख, वंदनाताई मोरे, रेणूताई गावंडे, डॉ. सीमा तायडे, स्वाती हिंगणकर, अर्चना पाटील बोळे, वैशाली गावंडे, विजयराव देशमुख, डॉ. राजेश तायडे, विठ्ठल गाढे पाटील, नरेंद्र काकड, राजेश मावळे, नेहरू पार्कचे संचालक बी एस देशमुख, देवराव पाटील हागे, डॉ. शशिकांत पवार, सतीश सुर्वे, डॉ. निलेश मोहोड, संदीप पाटील महल्ले, मंगेश लांडे, महेंद्र काळे, अमोल हिंगणे, अनिरुद्ध भाजीपाले, सिद्धार्थ तायडे, श्रीकांत बिहाडे, आशिष पाटील, संजय इंगळे, प्रा. जी बी सुरळकर, वीरेंद्र पोहरे यांचे सह इतरही गणमान्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन धनंजय मिश्रा यांनी, प्रास्ताविक अशोक पटोकार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा