मुख्य सामग्रीवर वगळा

रविवारी प्रसिद्ध होणारा स्तंभ 'कवडसा'


"सस्पेन्शन ऑर्डर करा ! ....."

       जागा बदलली, प्रदेश बदलला,  देश बदलला म्हणजे संस्कृती ,प्रथा - परंपरेत नक्कीच काहीतरी बदल होत असतो. प्रत्येक बदल हा काही चांगलाच असतो असं नाही. प्रत्येक प्रथा हीच समाजहिताची , लोककल्याणकारी असते, असंही नाही किंवा नसतेच असेही नाही. काही प्रथा मात्र निश्चितपणे लोकहितासाठी, समाजातील दुर्बल घटकांसाठी असतात आणि त्या सर्वच ठिकाणी असतात. खरं म्हणजे कोणत्याही समाजामध्ये असलेल्या प्रथा आणि परंपरा ह्या विशिष्ट हेतूने लोककल्याणकारी आणि दुर्बल घटकांसाठी असाव्यात, अशी अपेक्षा असते मात्र कालांतराने त्यामध्ये कुणाचा तरी  स्वार्थ जोडला जातो आणि त्या प्रथांची पूर्ती वाट लागली जाते लावली जाते. मग उरतात केवळ प्रथा आणि परंपरा .जेवढे लोक ,जेवढ्या पद्धती जेवढ्या संस्कृती असतात ,तेवढ्याच त्यांच्या ठिकाणी काही प्रथा असतात. कोणत्याही धर्म , कोणतीही प्रथा ,कोणतीही संस्कृती , मूळात वाईट नसते कारण ती निर्माण करण्यामागे हेतू हा नक्कीच लोकहिताचा असतो मात्र कालांतराने बदल होत होत त्यात  काही माणसांचा स्वार्थ शिरतो आणि मग उरते निव्वळ प्रथा - परंपरा आणि त्याचा आंधळेपणाने लोकांनी केलेला स्वीकार !
        एखादा मंत्र ,एखादी ऋचा ,एखादे वचन ,एखादी कृती किंवा एखादी प्रथा - परंपरा ही विचारपूर्वक केली काय आंधळेपणाने केली काय फारसा फरक पडत नाही . त्याचा परिणाम मात्र झाल्याशिवाय राहत नाही. माणूस औषध घेतो, पूजाअर्चा करतो , त्यामागे विश्वास असतो आणि हा विश्वास लोककल्याणासाठी, दुर्बल घटकांच्या हितासाठी असतो एवढं मात्र खरं ! माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असलेल्या सर्व क्षणांमध्ये अनेक प्रकारच्या प्रथा ,सर्वच धर्मांमध्ये ,सर्वच समाजामध्ये आढळून येत असतात. त्या का पाळाव्यात, याचा विचार मात्र करण्यात येत नाही, ही एक प्रकारची सामाजिक खंतच आहे. यामुळेच की काय टीकाकार म्हणतात प्रथा आणि परंपरांचे आंधळेपणाने पालन केले जाते ! जसा- जसा काळ बदलतो , माणसाची बुद्धी विकसित होते , विज्ञानाचा प्रसार होतो , त्याच वेळेसअनेकांचा ' डाव 'उघडकीस येतो तसा - तसा प्रथा आणि परंपरांमध्ये काही प्रमाणात तरी बदल व्हायलाच पाहिजे की नाही ? नक्कीच व्हायला पाहिजे मात्र त्यातील शास्त्र अन् तत्त्वांचा विसर मात्र माणसांना पडू नये अशी अपेक्षा कुणी करत असेल, तर त्यात चुकीचे तरी काय ? सगळ्याच प्रथा आणि परंपरा ह्या योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत असा समज मात्र माणसाच्या मनात असायलाच नको हेही तितकेच खरे !
      आधुनिकीकरणांमध्ये  वाईट प्रथा या नक्कीच पायदळी तुडवल्या गेल्या पाहिजेत अन् माणुसकीच्या ,दुर्बल घटकांच्या हितासाठी असलेल्या देश- विदेशातल्या प्रथा आणि परंपरांचे अनुकरण सर्वच ठिकाणी व्हायला काय हरकत आहे ? माणसं एखाद्या हॉटेलमध्ये जातात, काही ऑर्डर करतात, त्याच वेळेला ते म्हणतात एक सस्पेन्शन सुद्धा द्या ! ही प्रथा युरोपमधल्या नॉर्वे या देशात असल्याचे सर्वत्र पसरले हे खरं आहे मात्र अनेक देश, अनेक प्रदेश आपल्या पद्धतीने, संस्कृतीने ही प्रथा पाळत आहेत. ग्राहकाने दिलेल्या ऑर्डर मध्ये  सस्पेन्शन सह पैसे तो देतो आणि निघून जातो त्याला हवी असलेली ऑर्डर घेऊन ! काही वेळाने त्या ठिकाणी गरीब- दुर्बल माणूस येतो आणि काही सस्पेन्शन आहे काय, असं विचारतो. हॉटेल मॅनेजर ते सस्पेन्शन योग्य त्या व्यक्तीला शांतपणे देतो. हे सुरूच राहतं दिवसभर. सस्पेन्शन साठी पैसे देणाऱ्या आणि सस्पेन्शन घेणाऱ्या माणसाला माहीत नसतं कुणी दिलं, कुणी घेतलं ! कुणाला त्याची गरज ही भासत नाही कारण गरजू व्यक्तींसाठी केलेलं ते दान असतं - सस्पेन्शन या शब्दाखाली ! जगामध्ये मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अनेक प्रकारचे दुर्घटना घडत असतात ,त्यावेळेला जगातील माणसंच नव्हे देशाचे राज्यकर्ते सुद्धा धावून जातात, सहकार्य करतात मदत करतात कारण त्यांच्यामध्ये माणुसकीची भावना ही निश्चित कायम असते अन् कुणाला तरी मदत करण्याचीही गरजही असते.भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे विविध प्रकारचे दान करण्यात येते मात्र त्याचा फायदा हा गरजू व्यक्तींना झाला तर त्या  समाधानाचं  मोल देणाऱ्याला असतं. गरज नसताना, दुर्बल नसताना फुकट घेणाऱ्याला नाही !
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक ,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन , अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...