मुख्य सामग्रीवर वगळा

दर्यापूर परिसरातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक - विश्वस्त प्रा.गजानन रामकृष्ण भारसाकळे यांच्या गोसेवा कार्यातील एका नाविन्यपूर्ण संशोधन


गोसेवेतील नाविन्यपूर्ण संशोधनाला कॉफीराईट मान्यता
      
        
प्रा. गजानन भारसाकळेंचे              पर्यावरणीय तथा शेती विकासाचे          प्रभावी कार्य             
           
अकोला : 
एखाद्या वैशिष्टपूर्ण कार्यासाठी केंद्र शासनाच्या निकषानुसार समाधानकारक कार्यपूर्तता झाल्यानंतर  भारत या कार्याला सरकारची कॉफीराईट मान्यता प्रमाण पत्राद्वारे प्रदान करण्यात येते. दर्यापूर परिसरातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक - विश्वस्त प्रा.गजानन रामकृष्ण भारसाकळे यांच्या गोसेवा कार्यातील एका नाविन्यपूर्ण संशोधन कार्याला भारत सरकारकडून नुकतेच कॉपीराईट प्राप्त झालेले आहे. 
        त्यांच्या संशोधनाचे शिर्षक " गायीच्या शेणापासून बायो-एनर्जी आणि सेंद्रिय खते निर्मितीद्वारे शाश्वत ग्रामीण विकास" असे असून हे केवळ शास्त्रीय दृष्टीकोनातून महत्वाचे नाही तर ग्रामीण भागाच्या आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक विकासासाठी एक प्रभावी उपाय ठरणारे आहे. 
         त्यांच्या या कार्यामुळे स्वच्छ ऊर्जा निर्मिती, नैसर्गिक खतांचा उपयोग आणि पर्यावरणपूरक शेती यांना अधिक चालना मिळणार असून या कृतीपूर्ण सिद्ध संशोधनाने ग्रामीण भागाला शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा एक नवा मार्ग मिळाला आहे.  हा कॉपीराईट म्हणजे केवळ वैयक्तीक यश नसून गजानन भारसाकळे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत बाभूळगांव - अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयासाठी तथा पर्यायाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी गौरवाची बाब आहे.
      या कार्यार्थ केंद्रशासनाच्या मुंबई कार्यालयात पेंटेंट सुद्धा रजिस्टर करण्यात आले असून त्यांच्या या पुढील पेटेंट संशोधन प्रवासासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, उपाध्यक्ष ॲड गजाननराव पूंडकर तथा केशवरावजी मेतकर, कार्यकारिणी सदस्य हेमंतराव काळमेघ तथा प्राचार्य केशवरावजी गावंडे, अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगांव - अकोला येथील महाविद्यालय सी डी सी समिती सदस्य प्राचार्य डॉ अनंत मराठे, प्राचार्य डॉ आशिष महल्ले तथा प्राचार्य डॉ सुनिल सोमाणी तसेच  प्राचार्य डॉ प्रशांत थोरात, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद, महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे  प्र-कुलगुरु डॉ महेंद्रजी ढोरे , भारत कृषक समाज अमरावती जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब मेथकर , डॉ पंजाबराव अर्बन को ऑप बँक अमरावतीचे अध्यक्ष प्रा.नरेश पाटील, आय ए एस अकादमीचे अध्यक्ष डॉ नरेशचंद्र काठोळे , गाडगेबाबा मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बाप्पूसाहेब देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संपूर्ण विश्वस्त मंडळ, प्रा गजानन भारसाकळे अध्यक्ष असलेल्या गाडगेबाबा मंडळाचे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले सभासद, ते माजी सरपंच असलेल्या बेलोरा या जन्मगावातील नागरीक, सर्व आप्तेष्ट व बहुसखेने असलेल्या मित्र परिवाराने दूरध्वनी संदेशाद्वारे प्रा. गजानन भारसाकळे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
     त्यांना पर्यावरण व समाजसेवा या कार्याबाबत गेल्या वीस वर्षात विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या द्वारे निर्मित प्रकल्पांना शासकीय अनुदानही प्राप्त आहे ही बाब इथे अतिशय उल्लेखनिय आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...