प्राचीनतेची साक्ष देणारे बार्शिटाकळीतील श्री कालंका माता मंदिर
• शारदीय नवरात्रीत भाविक भक्तांची मोठी गर्दी
• हेमांडपंथी शिल्पकलेचा एक उत्कृष्ठ व अप्रतिम नमुना
(ज्येष्ठ पत्रकार मुफीज खान)
बार्शिटाकळी :
शहरातील श्री कालंका माता मंदीरा मध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केल्या जात आहे. बार्शिटाकळी शहराची आध्यात्मीक ओळख व अकोला जिल्ह्यातील भावीकांचे शक्तीस्वरूप जागृत देवस्थान म्हणून बार्शीटाकळी शहरातील श्री कालंका माता राष्ट्रीयस्मारक भवानी मंदिर मागील अनेक शतकांन पासून विदृपा नदीच्या काठावर बसलेले आहे. कालंका माता भवानी मंदिर अति प्राचिन व हेमाडपंथी काळातील असल्याने तात्कालीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ठ व अप्रतिम नमुना आहे. आर्कषक व मनमोहक काळ्या दगडा वरील कोरीव नक्षीकाम या मंदिराच्या ऐैतीहासीक प्राचिनतेची साक्ष पटवते.
वर्षभर पंचक्रोशीतील भावीकभक्त नवरात्रीत हर्षउल्हासात कालंका मातेच्या दर्शनाकरिता
मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात,
नवरात्रीत नऊ दिवस कालंका माता स्वतः मंदिरात असल्याचा साक्षात्कार भक्तांना होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. शेदुंराचा मुखवटा असलेले कांलका देवीचे स्वरूप एखांद्या दिव्य तेजपुंजा प्रमाणे दिसुन येते या मंदिरातील मूर्तीचे तेज आजही शाश्वत आहे. भावीक भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या या भवानी मातेच्या मंदीराला ऐतीहासीक महत्व प्राप्त आहे. कांलका माता मंदिर हेमाडपंथी शैलीची उत्कृष्ट कलाकृती असून, सन १९५८
पासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून सुविधा व सुव्यवस्था या आधारे देखरेखीत अधिगृहीत असून नियंत्रणात आहे. अकोला शहरापासून दक्षिणेस १८ ते १९ कि.मी. अतंरावर मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील एका लांब दगडीवर चिऱ्यावर संस्कृत व नागरी भाषे मध्ये शिलालेख लीहलेला आहे.
त्या लेखावरील तारीख गुरुवार वैशाख शुक्ल सात, दुर्मख संवत्सर शके १०९८ म्हणजेच ७ एप्रील सन ११७७ मध्ये या मंदिराचे बांधकाम झाल्याचा उल्लेख असल्याचे जानकार वयोवृद्ध भक्तांकडून सांगण्यात येते. मंदिर निर्मिती करिता अखंड काळ्या दगडाचा वापर करण्यात आला असून, मंदिराचे गृभगृह, अतंरळा, सभा मंडपयुक्त आहे. मंदिराची बांधणी सुरेख देखणी व नक्षीदार आहे, कालांतराने मंदिराच्या कळसाचा भाग नष्ट झाल्या सारखा दिसून येतो, मंदिराचे प्रवेश व्दार हे नेहमी प्रमाणे गाभार्याच्या समोर नसून सभा मंडपाच्या बाजूस आहे. दहा ते बारा फुट पायर्या चढत मंदिरात प्रवेश करावा लागतो,
सभामंडप चौकोनी असून, या सभामंडपाला चार प्रमुख नक्षीदार खांबाचा आधार आहे. त्यावर देवी- देवतांच्या प्रतिमांचे कोरीव काम केले आहे. तर, मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा दिसतो, दगडावर कोरीव नक्षीकाम अतिशय सुंदररित्या केले आले आहे, मंदिराच्या आत व बाहेरून कोरीव नक्षीकाम करण्यात आल्याने मंदिराला ऐतिहासीक वारसा लाभला आहे. हेमांडपंथी प्राचिन कलेचे अप्रतिम दिव्यस्थानाचे महत्व प्राप्त असलेले कालंका माता मंदीर, बार्शीटाकळी शहराच्या बाजूस दक्षिणेस एकाकी अवस्थेत पडले असून, मंदिर आजही सामान्याच्या दृष्टीपासून फार दूर असल्याचे दिसून येते. भारतिय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या मंदिरा कडे पुरातत्व विभागाचे कोणत्याचे प्रकारचे लक्ष नसल्याने मंदीराच्या वास्तुस जाग जागी चिरा पडल्या आहेत. वांरवार निवेदन देवूनही कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने भावीक भक्तांचे श्रध्दा स्थांन मागील अनेक वर्षा पासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहे. नवरात्रीत मात्र येथे भाविकांची गर्दी पाहवयास मिळते. नवरात्र महोत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील नागरीक व भावीक भक्तांचा मोठा सहभाग दिसुन येतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा