• वाल्मिकी समाज सभागृह निर्मितीमुळे वचनपूर्तीचा आनंद
• आमदार साजिद खान पठाण यांचे प्रतिपादन
अकोला : माझ्या राजकीय जडणघडणीत अठरापगड जातीधर्माच्या मंडळीचा मोलाचा वाटा असून त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंतचा माझा राजकीय प्रवास करू शकलो. त्यात भरीस भर म्हणून वाल्मिकी समाजबांधवांनी प्रत्येक वळणावर मला निरपेक्ष मदत केली. अकोला महानगरपालिकेचा विरोधीपक्षनेता असतांना वाल्मिकी समाजबांधवांशी जुळलेले ऋणानुबंध उत्तरोत्तर दृढ होत गेले. आज अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून वाल्मिकी समाज सभागृहाचे उदघाटन करतांना वचनपूर्तीचा आनंद माझ्या मनात ओसंडून वाहत आहे असे भावनिक प्रतिपादन आमदार साजिद खान पठाण यांनी केले.
प्रभाग क्र. 07 मधील विजय नगर, तारफैल, अकोला येथे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते वाल्मिकी समाज सभागृहाचे उद्घाटन सोमवारी उत्साहात पार पडले. प्रभाग क्र. 07 मधील विजय नगर, तारफैल, अकोला येथे वाल्मीकि समाजासाठी सभागृह नसल्याने सदर समाजातील नागरिकांना त्यांचे कार्यक्रम साजरे करण्यासाठी मोठी अडचण निर्माण व्हायची. साजिद खान पठाण यांनी अकोला महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता असताना वाल्मिकी समाजाकरिता सभागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून भूमिपूजन केले होते. सभागृहाचे बांधकाम दलितवस्ती निधी अंतर्गत करण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते सोमवारी ( दि. 27 जानेवारी ) रोजी करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम वाल्मीकी समाज समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. समारंभाध्यक्ष आमदार साजिद खान पठाण यांच्यासह प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, समाजसेवक मोंटू उर्फ मोईन खान, समाजभूषण अनुप खरारे, भगवानदास बोयत, अशोक चिरावांडे, मोहन येवले, गोंटू गोडाले, राजकुमार वाघमारे, राजू शुक्रवारे, एलसी मेश्राम, मोहम्मद वसीम, धम्मा वाघमारे, दिनेश खोब्रागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लखन नकवाल, जमदार यांनी तर आभार प्रदर्शन ईश्वरजी थामेत यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाल्मिकी समाज महिला मंडळ तसेच विशेष सहयोग म्हणून पारोचे, सुनील डागोर, लखन थामेत, सौरभ थामेत, देवा थामेत, संजू कलाने, रवी खरारे, सतीश खरारे, भुऱ्याभाई निनोरे, अजय खरारे, कमलेश थामेत, कैलासजी खरारे, भारत खरे, रणजीतजी गोडाले, सागर सारसर, रवी गोडाले, प्रताप खरारे, अशोक मिलांदे, सुमित खारीया, किशोर चंडाले, सुरज खरे, राजू भारोदे, संजू गोराणे, गणेश टाक, शंकर नेवाते आदींनी अविश्रांत परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा