मुख्य सामग्रीवर वगळा

आयएएस परीक्षेत सुयश प्राप्त



 •   गरीब वस्तीत राहणाऱ्या पल्लवीची उंच भरारी

  •  आयएएस परीक्षेत सुयश प्राप्त

अकोला : अमरावतीच्या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची आई मशीनवर शिलाई काम करते. कुमारी पल्लवी ही अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी चपराशी पुरा या स्लम एरियामध्ये राहते. 

      बिच्छू टेकडीतून पाहणाऱ्या नाल्याच्या काठावर तिचे घर आहे. एवढ्या आधुनिक काळातही तिच्या घराला जायला अद्यापही रस्ता नाही आहे. 

ती जेव्हा सातव्या वर्गात होती तेव्हा मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी ती गेली होती.

       तिचे वडील तिला या कार्यशाळेला घेऊन गेले होते. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्यामुळे तिचे वडील तिला दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली. 

     श्री काठोळे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थी यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके सप्रेम भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला.

      श्री तुकाराम मुंढे यांच्यापासून तसेच त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन कुमारी पल्लवीने मी आयएएस अधिकारी होणारच असा निर्णय पक्का केला व त्या दृष्टिकोनातून तिने सातव्या वर्गापासूनच परीक्षेला तयारीला सुरुवात केली.

      तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराच्या इतिहासात एक मैंलाचा दगड रोवला आहे. ती ज्या भागात राहते त्या भागात अगोदर रान वन होते. 

      त्या भागात विंचू जास्त निघायचे म्हणून त्या भागाला आजही बिच्छू टेकडी या नावाने ओळखले जाते. या टेकडी जवळच वडाळी नावाचा तलाव आहे. 

     पल्लवीच्या घरासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. या मार्गावरून सतत ट्रकची येजा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करताना सतत व्यत्यय येत असतो. पण अशा विपरीत परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे.           आपल्या यशाचे श्रेय तिने आपले वडील श्री देवीदासजी चिंचखेडे यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. तिला तुकाराम मुंढे यांचे  शब्द आठवत होते

      .मी आयएएस अधिकारी होणारच. 

        तिने नोकरीचा राजीनामा दिला व महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या बार्टी या शासकीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आपले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेची तयारी पूर्ण केली. तिच्या या यशामुळे अमरावती शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉक्टर निधि पांडे. अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद. मिशन आय ए एस चे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी तिचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे. 

       अमरावती येथील सायन्स कोर या भव्य दिव्य मैदानात प्रशस्त अशा डोम मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार करण्यासाठी सुप्रसिद्ध कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी व संपूर्ण भारतातून दहावी रँक प्राप्त झालेल्या अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता मोहोपात्र यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला तिवसा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री राजेश वानखडे अचलपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री प्रवीण तायडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता मोहोपात्र   डीआरडीए च्या मुख्य संचालिका श्रीमती प्रीती देशमुख मिशन आय ए एस चे संचालक प्रा डॉ. नरेशचंद्र काठोळे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गायकवाड व पल्लवी चे वडील श्री देविदास चिंचखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे संचालन मंच सुप्रसिद्ध संचालिका श्रीमती पल्लवी यादगिरे यांनी केले. पल्लवीने आपल्या भाषणामध्ये उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले. तिचे भाषण संपल्यानंतर सभागृहातील उपस्थितांनी तिच्याबरोबर सेल्फी फोटो काढले तसेच तिला गराडा घालून तिच्या यशाची माहिती जाणून घेतली. अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून तिने संपादन केलेले आहे. त्यामुळे अमरावतीच्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा राहिला आहे. 

      अमरावतीच्या विद्यमान आमदार श्रीमती सुलभा खोडके यांनी देखील तिला त्यांच्या शोध प्रतिष्ठानच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील भव्य कार्यक्रमात निमंत्रित केले असून तिने हे या संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...