मुख्य सामग्रीवर वगळा

बिबट्याचा थरार, जनावरांची केली शिकार बिबट्याला तात्काळ जेरबंद करा : गावकरी

 


वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभावामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मूर्तिजापूर भागात वन्यप्राण्यांची संख्या नसल्यासारखीच आहे. यद्यपि, एक बिबट्या सध्या जामठी गावात भक्ष्य मिळविण्यासाठी जनावरांवर  हल्ले करू लागला आहे. जामठी गावात बिबट्याची दहशत काल रात्रीपासून पसरली आहे. 

      काल रात्री रात्री १.३० च्या सुमारास दोन पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला चढविला यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बेसुमार जंगलतोड व अवैध शिकारीमुळे एकीकडे वाघ, सिंहासारखे मार्जार कुळातील हिंस्त्र श्वापदे झपाट्याने कमी होत असताना याच कुळातील बिबट्याने मात्र आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मुळातच अतिशय चाणाक्ष, बुध्दिमानी व संधिसाधू स्वभावाचा बिबट्या, असेल त्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेण्यात तरबेज मानला जातो. तो अगदी हिमालयातील बर्फाळ प्रदेशापासून ते थेट समुद्र किनारपट्टीपर्यंत हमखास आढळून येतो. सहसा दाट झाडी-झुडपात लपून -छपून जीवन जगणारा बिबट्या अत्यंत ‘छलिया शिकारी’ समजला जातो. 

      मिळेल त्या परिस्थितीत मिळेल ती शिकार करण्याचं कसब अंगी भिनलेले बिबटे जंगले नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणत विस्‍थापित होत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. मानवी वस्त्यांत येऊन मिळेल त्या भक्षाची शिकार करताना त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागली आहेत.

सध्या अशाच एका बिबट्यांनी मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी या गावात ठाण मांडले असून, पारंपरिक शिकार मिळत नसल्याने या परिसरातील पाळीव प्राण्यांपाठोपाठ त्यांनी माणसांवरही हल्ले सुरू करेल याची शक्यता नाकारता येत नाही.

या मुळे जामठी व आजूबाजूचा गावात सध्या लोक खूप घाबरले आहेत. तरी वन विभागाने पंचनामा केले असून तातडीने या बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...