• प्रजासत्ताकदिनी केला माऊली फाउंडेशने
पोलीस बांधवाचा गौरव
अकोला :
देशासाठी समर्पणाचे कार्य करीत असलेल्या पोलीस विभागातील शिपाई बांधवांना प्रोत्साहन मिळून कार्य करण्याचा उत्साह वाढावा यास्तव माऊली फांउडेशनच्या संचालक मंडळानी डाबकीरोड पोलीस स्टेशन मधील पाच पोलीस अंमलदारांचा आज प्रजासत्ताकदिन २०२५ च्या राष्ट्रीय कार्यक्रमात २६ जानेवारी रोजी मान्यवराच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यकमा नंतर वरीष्ट्र सहा. निरीक्षक तथा ठाणेदार धर्मा सोनूने व फांउडेशनचे अध्यक्ष, संचालक यांच्या हस्ते पोलीस कॉन्सटेबल ( ट्राफिक इ चलन ) गजानन धोंगळे , महिला पोलीस कॉन्स्टेबल ( दामिनी दूचाकी )सुरेखा ठाकरे , प्रतिभा राठोड , पोलीस कॉन्स्टेबल (बिट मार्शल दुचाकी )भुषण खांडे,धीरज राठोड यांना लोगो सह प्रशस्ती पत्र , पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले .
यावेळी फांउडेशनच्या कार्याचे विवेचन अध्यक्ष ज्ञानेश्वर मांडेकर यांनी करून संचालक मंगेश लांडे, अजय बांडी , गौत्तमसिंह ठाकूर, सैय्यद रब्बानी यांनी योगदान करीत उत्कृष्ट सहभाग नोंदविला .


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा