मुख्य सामग्रीवर वगळा

'सूर्यबाला: संवेदनाओं का ज्योति पुंज' पुस्तक प्रकाशन

अकोला : "समाजात  संवेदनेचा  ओलावा कायम



ठेवण्यासाठी  सूर्यबाला सारख्या संवेदनशील लेखिकेचं साहित्य काळाची गरज आहे. त्यांच्या साहित्यातील संवेदनेचं गहन अध्ययन आणि समर्पक विश्लेषण या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. डॉ. पूनम पिसे  लिखित हे  पुस्तक  संग्रहनीय आहे आणि त्याचं स्वागत व्हायला हवं." असं वक्तव्य विद्योत्तमा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री  सुबोध कुमार मिश्र यांनी केल. ते विद्योत्तमा फाउंडेशनच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी समीक्षक म्हणून बोलत होते.विद्योत्तमा फाउंडेशन, नाशिक च्या पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताचं यशस्वी पने संपन्न झाला त्या प्रसंगी 'सूर्यबाला: संवेदनाओं का ज्योति पुंज' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. पुस्तकाची प्रस्तावना वरिष्ठ लेखक डॉ. दामोदर खड़से यांनी लिहिली आहे व  वनिका  प्रकाशन तर्फे पुस्तक प्रकाशित आहे.  या समारोहा प्रसंगी मोठ्या संखेने साहित्यकार आणि रसिक श्रोते व विद्योत्तमा फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजनाने झाला . श्रद्धा शिंदे यांनी आरंभी सुमधुर आवाजात सरस्वती वंदना सादर केली. अतिथींचं स्वागत विद्योत्तमा च्या पदाधिकार्यां कडून करण्यात आलं. या प्रसंगी  व्यासपीठावर विद्योत्तमा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सुबोध कुमार मिश्र,  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शीतला प्रसाद दुबे कार्याध्यक्ष - महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी, कार्यक्रम उद्घाटक श्री के. सी. पाण्डेय, सी. एम. डी. गारगोटी मिनरल संग्रहालय, नाशिक, मुख्य अतिथिडॉ. प्रो. राम कुलकर्णी झोनल सेक्रेटरी गोखले ए. सोसा., नाशिक. विशिष्ट अतिथि श्री अनिल कुमार प्रीतम क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त, नाशिक, पुस्तकाच्या लेखिका डॉ. पूनम मानकर पिसे, त्यांचे पति व किर्ति  प्रिंटर्स के संचालक श्री. संजय पिसे व  त्यांच्या मातोश्री श्रीमती सुनिता मानकर उपस्थित होत्या. कार्यक्रम च्या सुरूवातीला  संस्था अध्यक्ष श्री सुबोध कुमार मिश्र यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना विशद केली. त्यानंतर पुस्तका विषयी विस्तृत मनोगत व्यक्त केलं .या प्रसंगी विषेश अतिथि डॉ. राम कुलकर्णी यांनी  "'गोखले एज्युकेशन सोसाइटी या संस्थेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनीचं  साहित्य क्षेत्रातलं  पहिलं पाऊल एक गुरू आणि शिक्षक म्हणून आम्हाला सुखावणारं  आहे" असं मनोगत व्यक्त केलं.याप्रसंगी द्वितिय सत्रांत  सम्मान समारोह आणि तृतीय सत्रांत  कवि सम्मेलन आयोजित केलं गेलं होतं.कार्यक्रमाचं  सूत्र संचालन : ठा. भरत सिंह, डॉ सी. पी. मिश्र, श्रीमती अनीता दुबे, सुनिता माहेश्वरी, वर्षा सिंह यांनी तर आभार प्रदर्शन श्री स्वप्निल कुलकर्णी यांनी केलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...