मुख्य सामग्रीवर वगळा

अ.भा.ग्रा.पं.च्या वतीने स्वामी विवेकानंदांची १६३ वी जयंती उत्साहात

 


अकोला : 

१२ जानेवारी ला अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने भाऊसाहेब लहाने सभागृहात पितामह सुधाकरराव जकाते यांचे अध्यक्षतेखाली जगाला ज्ञानाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

        सुधाकरराव जकाते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या शहरात १२ शाखा काढण्यासाठी प्रयत्न करून सभासद बनविण्यासाठी अध्यक्ष, संघटन मंत्री यांनी प्रयत्न करावे असे आवाहन करून अध्यक्ष व संघटन मंत्री यांच्याकडून शब्द घेतला.

     मनोहर गंगाखेडकर यांच्या पत्नी स्व.सुचिता गंगाखेडकर व स्व .



भैय्यासाहेब मामू यांना दोन मिनिट मौन राखून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

      प्रास्ताविकात संघटन मंत्री दिनेश पांडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.भास्कर राव कळाशीकर ग्राहक पंचायत चे सेवाभावी वृत्तीने काम केले तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. डॉ.अशोक ओळंबे यांनी काहिही सुचना न देता टोईंग पथके गाड्या उचलतात त्यामुळे गाडी चोरीला गेली की टोइंग पथकाने नेली हे कळत नाही., अतिक्रमण, स्वच्छतागृहांची शहरात आवश्यकता आहे या बाबतीत प्रयत्न करणे गरजेचे आहे असे डॉ अशोक ओळंबे म्हणाले. अध्यक्ष मनजीत देशमुख व. दिनेश पांडे यांनी शपथ पूर्वक संघ स्थापन करू असे म्हणाले.कार्यक्रमाला सचिव प्रमोद बोरकर,विनोद मेहरे, सुनील बाळापूरे, विनोद जकाते, संजय देशमुख, व्ही व्ही देशपांडे, गुरुदेव आदी कार्यकर्ते हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बाहाकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद यादवडकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली, असे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर कळवितात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...