मुख्य सामग्रीवर वगळा

महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार शासकीय बालगृह अकोला येथे दिवाळी पहाट उत्साहात साजरी

🔶अकोला (जिमाका): दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रकाश आणि मांगल्याचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर बाल न्याय मंडळ व बालकल्याण समिती यांच्या पुढाकाराने शासकीय बालगृह, अकोला येथे संस्थेत दाखल असलेल्या बालकांसोबत दिवाळी पहाट हा आनंददायी उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
शासकीय बालगृहात निराधार, निराश्रित, हरविलेली तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बालकल्याण समितीच्या आदेशानुसार दाखल असतात. या बालकांनाही सण-उत्सवांचा आनंद अनुभवता यावा, त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे, या उद्देशाने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने बालकांना पारंपरिक पद्धतीने ओवाळून औक्षण करण्यात आले. तसेच बालकांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. बालकांसाठी दिवाळी फराळाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व, प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश यावेळी बालकांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती रोशनी बन्सल उपस्थित होत्या. यावेळी बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, बाल न्याय मंडळ सदस्य ॲड. सारिका घिरणीकर, बालकल्याण समिती सदस्य ॲड. शिला तोष्णीवाल, श्री. राजेश देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. राजू लाडुलकर, शासकीय बालगृहाच्या अधीक्षिका श्रीमती जयश्री हिवराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच बाल न्याय मंडळ, बालकल्याण समिती, शासकीय बालगृह, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, विपला फाउंडेशन, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी,एनकारेज फाउंडेशन आणि ISWS संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती रोशनी बन्सल म्हणाल्या की, “खरोखरच माझे अहोभाग्य आहे की, या बालकांसोबत दिवाळी साजरी करण्याची आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे दिवे प्रज्वलित करण्याची संधी मला मिळाली. बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा अनुभव अत्यंत समाधान देणारा आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शासकीय बालगृहाचे शिक्षक श्री. संजय मोटे यांनी केले.
बालकांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास यासोबतच त्यांना सण-उत्सवांचा आनंद मिळवून देणे हीदेखील संस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे बालकांमध्ये आनंद, आत्मविश्वास, आपलेपणा आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होण्यास निश्चितच मदत होते. बालकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
🌴 वृक्ष वाचवा🌴पृथ्वी वाचवा 🌴
🌴||झाडे लावा🌴झाडे जगवा||🌴. 
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...