मुख्य सामग्रीवर वगळा

8 नोव्हेंबर जयंतीनिमित्त

8 नोव्हेंबर जयंतीनिमित्त
दृष्टी असलेला कुलगुरू स्व.दादासाहेब काळमेघ


माझ्या 74 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी सामाजिक राजकीय साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर वावरलो. या सर्व क्षेत्रात वावरत असताना मला दृष्टी असलेले फार कमी लोक मिळाले. त्यामध्ये दादासाहेबांचा क्रमांक फार वरचा आहे. दादासाहेब  काळमेघ हे व्यक्तिमत्व आगळे वेगळे होते. अशी माणसे फार कमी जन्माला येतात. दादासाहेबांनी आपल्या बोलण्याने वागण्याने संस्काराने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यामुळे आज त्यांना जाऊन बरेच वर्ष जरी झाली तरी सर्वजण त्यांची आवर्जून आठवण काढतात. 
मला आठवते दादासाहेब काळमेघ हे श्री शिवाजी संस्थेचे अध्यक्ष होते. प्रत्येक वेळेस बहुमत पाठीशी असेल असे नाही .पण त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलली. त्या धावपळीच्या काळात मी त्यांचा भव्य नागरिक सत्कार अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेसमोरील श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृहामध्ये घडवून आणला होता. तो एक ऐतिहासिक समारंभ होता. 
दादासाहेब मला नेहमी म्हणायचे काठोळे तुम्ही आमच्या शिवाजी सोसायटीमध्ये पाहिजे होते. मी त्यांना नेहमी म्हणायचं की दादासाहेब मी तुमच्याबरोबर होतो आहे व राहिलही. आणि त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. ते मला एक पारिवारिक सदस्य मानत होते.
नागपूर विद्यापीठ कुलगुरू म्हणून असताना आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष असताना त्यांच्या कामावर बऱ्याच टिका टिपण्या झाल्या .परंतु टीकाटिपणी त्याच माणसावर होतात की जो माणूस करतो जो सतत कार्यरत राहतो. सातत्याने काम करीत राहतो. जो काहीच काम करीत नाही त्याच्यावर कधीच ठिकाणी चर्चा होत नाही. 
दादासाहेब प्रत्येक संकटाला समर्थपणे सामोरे जायचे .मग ते राजकारण असो की  प्रसारमाध्यम असो की काही प्रतिगामी संस्था असो. दादासाहेब हे आघाडीवरचे नेतृत्व होते .त्यांनी कधीही वाईट गोष्टींना साथ दिली नाही. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि तो दादासाहेबांवर निश्चित प्रेम करणारा आहे .
दादासाहेबांना भाषणाची लिखाणाची प्रवचनाची व कीर्तनाची विलक्षण आवड होती .काही लोक त्यांच्यावर टीका टीपणी करायचे. पण मी नेहमी दादासाहेबांची बाजू घ्यायचा .मी म्हणायचो की दादासाहेब किर्तन लोकांच्या प्रबोधन करतात .हे काय वाईट आहे .ते तर खऱ्या अर्थाने श्री संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वारसा पुढे चालवित आहेत. आपण त्यांच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
दादासाहेबांचा काम करण्याचा आवाका प्रचंड होता .ते कोणताही निर्णय पटकन घ्यायचे .जास्त विलंब लावायचे नाही .हा माझा हा तुझा हा माझ्या पॅनलचा हा त्याच्या पॅनलचा हा भेदभाव त्यांच्या ठिकाणी नव्हता आणि म्हणूनच अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की दादा साहेबांनी हात लावल्याबरोबर त्या लोकांच्या आयुष्याचे सोने झाले आहे . प्राचार्य डॉ. रामदास चवरे व नागपूर विद्यापीठाचे माजी  कुलसचिव डॉ. सुभाष बेलसरे हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. दादासाहेब खरं म्हणजे परीस होते. जिथे त्यांनी हात लावला त्या परिवाराचे त्या माणसाचे सोने झाल्याशिवाय राहिले नाही. त्यापैकी आम्हीही एक आहोत .
एकदा दादासाहेब एका महाविद्यालयाला भेट द्यायला गेले .प्राचार्य वर्ग खोल्या दाखवीत होते .प्रयोगशाळेत गेले. दादा साहेबांना प्राचार्य म्हणाले हा मुलगा एमएससी झालेला आहे आणि इथं प्रयोगशाळा परिचर म्हणून काम करीत आहे. दादासाहेबांनी त्याची चौकशी केली. तो गणितामध्ये एमएससी झालेला होता. दादासाहेब त्याला म्हणाले अरे तू इथे काय करतोस  ? तिथे भंडारा जिल्ह्यातील पवनीला आपले विज्ञान महाविद्यालय सुरू झालेले आहे. तिथे प्राध्यापक म्हणून जा. जाहिरात नाही इंटरव्यू नाही डायरेक्ट ऑर्डर. पुढे त्याची नेमणूक रितसर करून घेता येईल.  हे करायला धाडस लागते .जे दादासाहेबांच्या ठिकाणी निश्चित होतं. 
एक वेळ मी श्री शिवाजी सोसायटीच्या ऑफिसमध्ये श्री दादासाहेब काळमेघ यांच्या कक्षात बसलो होतो. कुठल्यातरी महाविद्यालयाचे  प्राचार्य आले .त्यांनी कसला तरी कर्मचारी भरतीचा आराखडा आणला होता. दादा साहेबांनी सचिवांना बोलाविले. आणि भराभर दहा-बारा लोकांच्या नेमणूक करून टाकल्या .ते म्हणाले जागा खाली आहेत त्या भरून टाका. त्या नियमित आपण नंतर करू .पण सध्या त्यांना आपण तात्पुरते वेतन देऊ. रिकाम्या जागा कशाला ठेवायच्या. इतका धाडसी निर्णय दादासाहेबच घेऊ शकत होते .इतरांची तर ताकदच नव्हती.
दादासाहेबांच्या सत्काराच्या दिवशी मी दादांचे अभंग हे त्यांचे पुस्तक प्रकाशित केले. त्यामध्ये दादांनी लिहिलेले अभंग होते .मी दादासाहेबांना म्हणालो दादासाहेब बघा तुम्ही आता 63 वर्षाचे झाले .तुम्ही विद्यापीठाचे कुलगुरू होते. तुम्ही शिवाजीचे अध्यक्ष आहेत आणि तुमचे पुस्तक त्यासाठी ६३   व्या वर्षी निघत आहे .सांगा बरं आपला बहुजन समाज साहित्याच्या बाबतीत किती मागास असलेला आहे. दादासाहेबांना ते पटले ते म्हणाले तुम्ही कामाला लागा. मी मदत करतो. 
एक वेळ काही साहित्यिक मंडळी माझ्याकडे आली .त्यांनी एक साहित्य संमेलन घेतले होते .त्यांना एक वेळचे जेवण पाहिजे होते. जेवणाचा खर्च तीन हजार रुपये होता .मी त्यांना दादा साहेबाकडे घेऊन गेलो. दादा साहेबांना सांगितले की यांचे साहित्य संमेलन आहे .तुम्हाला एक जेवण द्यायचे आहे .3000 रुपये खर्च आहे. दादासाहेब माझ्यावर खूपच रागावले. मला कळेना .शेवटी दादासाहेब म्हणाले काठोळे तुम्हाला समजत नाही का . मी शिवाजी सोसायटीचा अध्यक्ष आहे .एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे .तुम्ही त्यांना 3000 रुपये मागता. अरे तीन लाख मागा .मी तीन लाख देतो. तुम्हाला चांगली साहित्य चळवळ उभी करा. आम्ही पाहत  राहिलो. मागायला गेलो काय आणि दादांनी देऊ  केले तीन लाख. याला म्हणतात दृष्टी .ती दादासाहेबांच्या ठिकाणी होती. म्हणून ते खंबीरपणे बोलत होते .लिहीत होते आणि वागत होते. 
दादासाहेबांना राजकारणात जायचे होते .पण ते जमले नाही .पण दादासाहेब म्हणायचे मी नाही गेलो तर काय झालं ?  अरे माझी पोरं माझे विद्यार्थी  आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत .मी मुख्यमंत्र्याला अरे तुरे म्हणू शकतो. मी मंत्री  नाही झालो आमदार खासदार लोक प्रतिनिधी नाही झालो तर काय फरक पडतो आणि हे खरेच आहे. त्या काळचे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री दादा साहेबांना मानायचे .कारण की त्यांनी अशा धाडसी स्वभावाचा माणूस पाहिला नव्हता .मिळमिळीत माणसे पाहून ते देखील  दादासाहेबांचे नेतृत्व मान्य करीत होते. 
दादासाहेबांच्या खूप आठवणी आहेत. दादासाहेबांना खरा न्याय दिला तो त्यांचे सुपुत्र श्री हेमंत काळमेघ यांनी .आम्ही पुढे चालू हा वारसा .हा मंत्र त्यांनी मनोमन जपला. हेमंत रावांना काम सांगितले आणि झाले नाही असे होतच नाही. ते मला काका म्हणतात. कुठे दिसलो तरी वाकून नमस्कार करतात .दादासाहेबांनी त्यांच्यावर जे  संस्कार केले. त्या संस्काराचे ते अनुकरण करतात. आज दादासाहेब नाहीत पण दादासाहेबांनी हेमंतरावच्या रूपाने एक कर्तृत्ववान तरुण श्री शिवाजी सोसायटीच्या कार्यकारिणी मध्ये दिलेला आहे आणि हा तरुण निश्चितच दादासाहेबांचा वारसा पुढे चालविणारा आहे. दादासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त  विनम्र अभिवादन. 
000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...