मुख्य सामग्रीवर वगळा

आरोग्य धनसंपदा

ना जिम, ना डायटिंग; फक्त हळदीचा असा करा वापर, पोटाची चरबी वितळेल सरसर
     आजकाल धावत्या जीवनशैलीमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढताना दिसते. वाढत्या लठ्ठपणामुळे, वजनामुळे सकाळच्या व्यायामापासून ते आहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोक चिंतेत असतात. हल्ली लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करु शकतात. पण थंडीच्या दिवसांमध्ये वजन कमी करणे अवघड होऊन जाते. दिवसभर बसून कामे केल्याने आपोआपच वजन वाढते आणि पोटावर चरबीचा घेर वाढू लागतो. 
काही केल्या जर वजन कमी होत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायही करून पाहावेत.
     आज आम्ही तुम्हाला घरात सहज उपलब्ध असणाऱ्या हळदीचे फायदे सांगणार आहोत..
NCBI ने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार वाढलेले वजन कमी करण्यासाठी हळदीचे पाणी फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी  नामक घटक आढळतात. शिवाय यामध्ये असणाऱ्या ‘करक्युमीन’मुळे शरीरातील फॅट सहज कमी होते असे तज्ञ सांगतात.
एका अध्ययनानुसार, वजन कमी करण्यासाठी ४४ लोकांवर केलेल्या यशस्वी प्रयोगामध्ये दिवसातून  दोन वेळा हळदीचे सेवन केल्यास त्यांचा बीएमआय कमी होतानाचे आढळले. याशिवाय कमरेच्या खालील भागामधील चरबीदेखील कमी झाली. 
हळदीमध्ये विटामीन सी, पोटॅशिअम, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह,कॉपर, झिंक, थायमिन तसेच राइबोफ्लेविन चे गुणधर्ण असतात. यामुळे त्वचेच्या विकारांपासून संरक्षण होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कच्ची हळद पाण्यामध्ये उकळून घ्यावी. हे मिश्रणयुक्त पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

कृती..
१. सुरुवातीला एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्यावे, ते पाणी गरम झाले की त्यात साफ  केलेली कच्ची हळद टाकावी. 

२. पातेंल्यात यात १ ग्लास पाणी शिल्लक राहिल इतके पाणी उकळु द्यावे. त्यानंतर हे  हळदीचे पाणी गाळून घ्यावे. 

 ३. तज्ञांच्या सल्ल्यानुसार, रोज नियमितपणे हळदीचे पाणी न चुकता प्यावे, तुम्हालाही फरक जाणवेल. 
•डॉ. सुनील इनामदार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...