🔶अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान यंत्रणेतील कंत्राटी अधिकारी, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या समायोजन आमच्या प्रलंबित मागणीसाठी थाळी बजाव आणि काळ्या फिती लाऊन आंदोलन केले.
त्यांच्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय समाजाभिमुख संघटनेने भेट द्यावी अशी ईच्छा त्यांच्या कृती समितीचे जिल्हा समन्वयक डॉ.रामू नागे, आमचे मुळ निंबा येथील डॉ.जुगलकिशोर चितलांगे व डॉ.अनुजा कृष्णराव देशमुख यांनी व्यक्त केली.त्यानुसार त्यांच्या आंदोलन मंडपाला भेट देऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेण्यात आल्या.यावेळी संघटनेचे राष्ट्रीय संघटन संपर्क प्रमुख,दै देशोन्नतीचे संपादक मा.प्रकाशभाऊ पोहरे सुध्दा उपस्थित राहणार होते,परंतू ते नागपूरला होते.या भेटीच्या दरम्यान माझे सोबत लोकस्वातंत्र्यचे केन्द्रीय पदाधिकारी श्री अंबादास तल्हार,जिल्हा मार्गदर्शक पदाधिकारी श्री विजयराव बाहकर,सहसचिव श्री सागर लोडम उपस्थित होते. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पत्रकारांसोबत सुलभ सामाजिक सेवांसाठी समाजाचेही प्रश्न घेऊन पत्रकारिता आणि सामाजिक अशा संकल्पनेने चालणारी कृतिशील पत्रकार संघटना आहे.
कोरोनाच्या संकटग्रस्त काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा सुरळीत ठेऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचविणार्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचार्यांचे समायोजन करून शासनाने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व आयुक्त आरोग्य व अभियान यंत्रणा यांचेकडे कालच मेलव्दारे पत्रे पाठवून केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अशा अधिकारी कर्मचार्यांचे देशातील 7 राज्यांनी समायोजन केलेले आहे. परंतू महाराष्ट्रात वारंवार मागण्या होऊन आणि न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही शासनाने त्यांना न्याय दिलेला नाही. या अधिकारी कर्मचार्यांच्या कोरोना काळातील आरोग्यसेवेची समाजासोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघानेही दखल घेतली आहे. त्याचप्रमाणे शासनाने त्यांना अधिक उर्जादायी आरोग्य सेवेसाठी प्रोत्साहन द्यावे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणारी आंदोलने आणि पुढील व्यापक दिशा पाहता आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, ही बाब शासनाने लक्षात घ्यावी. वाढत्या महागाईच्या काळात त्यांच्या कुटूबांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
०००



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा