आ. रणधीर सावरकर व खा.अनुप धोत्रे यांनी मानले शासनाचे आभार
🔷 अकोला : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ₹5,000 च्या तातडीच्या अग्रिम मदतीपेक्षा त्या मदतीवरील जाचक अटी शिथिल करण्याचा निर्णय हा जास्त दिलासादायक आणि महत्त्वाचा आहे. 28 ऑक्टोबरच्या सुधारित जीआरनुसार सरकारी कर्मचारी, नोकरदार व करदाता शेतकऱ्यांना वगळण्याची जाचक अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यातील जवळपास दीड कोटी पात्र शेतकरी ज्यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांना सरसकट लाभ मिळणार आहे.
तसेच बँकांनी ही रक्कम जुन्या कर्जापोटी वळती करू नये, असे स्पष्ट आदेश सरकारने दिल्याने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे.
सरकारने फक्त रक्कम दिली नाही तर शेतकऱ्यांच्या हाताला लागणाऱ्या अटींचे जोखंड तोडले आहेत. या संवेदनशील व शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पवार व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा