मुख्य सामग्रीवर वगळा

नवकल्पना, संशोधन आणि सर्जनशीलतेचा संगम

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला येथे जिल्हास्तरीय ‘आविष्कार २०२६’ 
       नवकल्पना, संशोधन आणि                      सर्जनशीलतेचा संगम
🔶अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रायोजित जिल्हास्तरीय ‘आविष्कार २०२६’ स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बाभूळगाव, अकोला येथे करण्यात आले. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण १२० संघांनी सहभाग नोंदविला. सुमारे १९० विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे, नाविन्यपूर्ण कल्पनांचे तसेच शैक्षणिक संशोधनाचे सादरीकरण करून आपली गुणवत्ता प्रदर्शित केली.
‘आविष्कार २०२६’ ही स्पर्धा सहा प्रमुख विषयगटांमध्ये आयोजित करण्यात आली. यामध्ये मानवविद्या, भाषा व ललित कला; वाणिज्य, व्यवस्थापन व विधी; शुद्ध विज्ञान; कृषी व पशुसंवर्धन; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान; तसेच वैद्यक व औषधनिर्माणशास्त्र या विषयांचा समावेश होता. ही स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) आणि पदव्युत्तर संशोधन (PPG) अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात आली. 
या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात यांच्या  मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आविष्कार २०२६ चे अकोला जिल्हा समन्वयक डॉ. पंकज अर्डक यांनी उद्घाटन समारंभात प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून सहभागी झालेल्या विद्यार्थी स्पर्धकांचे तसेच महाविद्यालयीन समन्वयकांचे स्वागत केले. संशोधन, नवकल्पना आणि सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणासाठी आणि स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभाला एल. आर. टी. महाविद्यालय, अकोला येथील प्राध्यापक डॉ. वर्षा सुखदेवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात होते. यावेळी विविध विभागांचे प्रमुख डॉ. श्रीकांत सातारकर, डॉ. गोपाल झामरे, डॉ. रश्मी टाले, डॉ. अभिनंदन गुप्ता, डॉ. सुधीर ढोमणे, डॉ. प्रेम भनावत आणि प्रा. सौरभ सोनखास्कर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन विभागप्रमुख प्रा. गजानन भारसाकळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सहभागी विद्यार्थ्यांना संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून संशोधनवृत्ती जोपासण्याचे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे आवाहन केले. तसेच बदलत्या औद्योगिक गरजांनुसार तांत्रिक ज्ञानासोबत व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख अतिथी डॉ. वर्षा सुखदेवे यांनी संशोधन आणि विकासासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, समर्पण, सर्जनशीलता आणि तार्किक विचारशक्ती ही आवश्यक कौशल्ये असल्याचे प्रतिपादन केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. श्रीकांत सातारकर ,डॉ. गोपाल झामरे आणि प्रा. गजानन भारसाकळे  यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधनात्मक कार्याला आणि भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. मनीषा कोडापे, विद्यापीठ समन्वयक, आविष्कार २०२६ यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंकज अर्डक यांनी अकोला जिल्हा समन्वयक म्हणून स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या समन्वयातून स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. शर्वरी दीक्षित यांनी, तर पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. शारदा देशमुख यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. शशिकांत ठाकरे , प्रा. ऋतुजा देशमुख,प्रा. विजय कोकाटे, , प्रा. धीरज दांडेकर, , प्रा. राधिका राऊत, प्रा. अक्षय काळमेघ, , प्रा. सुधीर ढोमणे, प्रा. महेश पुंडकर , प्रा. अमित खेडकर,प्रा. चेतना भगत, प्रा. वेद कुलट, ,श्री. विठ्ठल ढोबळे श्री. महेंद्र पिठे आणि सारंग काकड यांनी मोलाचे योगदान दिले. सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी देशमुख, संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारिणी सदस्य तसेच स्थानिक व्यवस्थापन पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...