उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देत डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याचे तसेच समाजात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले.
शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात एसकेसी सायबर वॉरियर्स क्लबचा पदाधिकारी स्थापना सोहळा उत्साहात
(आदित्य गोतमारे यांजकडून )
✍🏻अकोला : शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे Quick Heal Foundation, पुणे यांच्या Cyber Shiksha for Cyber Suraksha उपक्रमांतर्गत एसकेसी सायबर वॉरियर्स क्लबचा पदाधिकारी स्थापना सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू हे उपस्थित होते. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. मालपाणी, डॉ. डिंपल मापारी, संगणकशास्त्र विभागप्रमुख व Quick Heal Foundation च्या शिक्षक समन्वयक डॉ. दीप्ती पेठकर तसेच डॉ. नितीन सुरडकर यांच्या हस्ते एसकेसी सायबर वॉरियर्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना बॅज प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये अध्यक्ष आदित्य गोतमारे, सचिव ओम गुजर, मीडिया डायरेक्टर सिया अग्रवाल, ॲक्टिव्हिटी डायरेक्टर तृप्ती निळकंठ यांच्यासह पूर्वा ताथे, तनुजा घोगरे, चंचल निंबाळकर, ईश्वरी मोकळकर, साक्षी फाटकर, हर्षा बिहाडे, श्वेता राठोड, कल्याणी खंडारे, कल्याणी झटाले, सलोनी वानखेडे, प्रणव लंके, आनंद लाहोळे, क्षितिज भोजने, रीतेश तायडे, प्रगती सोनवणे आणि रोशनी शिंदे या सायबर वॉरियर्सचा बॅज लावून गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देत डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याचे तसेच समाजात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. सायबर वॉरियर्स क्लब हा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून शाळा, महाविद्यालये व समाजामध्ये सायबर सुरक्षा विषयक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. श्वेता राठोड यांनी केले, तर प्रा. स्मिता धनोकार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
संवाद : 9371854706
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी)
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावतीमहत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706 ____________________________ ________
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
____________________________ ________

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा