मुख्य सामग्रीवर वगळा

८वेळा विश्वविक्रमाची नोंद करणारे

८वेळा विश्वविक्रमाची नोंद करणारे 
सुप्रसिद्ध गायक व संगीतकार विराग वानखडे 13 व 14 मे रोजी अमरावतीला येणार
                  लेखक
        प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
        संचालक, मिशन आयएएस                             अमरावती कॅम्प 
        संवाद : 9890967003

      ठ वेळा विश्वविक्रम केलेले सुप्रसिद्ध गायक तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व असलेले अमरावतीचे सुपुत्र व पद्मश्री साठी नामांकन झालेले सुप्रसिद्ध गायक व संगीतकार श्री विराग वानखडे हे येत्या 13 व 14 मे ह्या तारखेला अमरावती येथे येत आहेत. त्यानिमित्त दिनांक 14 तारखेला सायंकाळी सहा वाजता अमरावती जवळून वलगाव येथील परतवाडा रोडवरील सिकची  रिसॉर्ट येथील कृषी भवनात त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.
       श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या सत्काराला संगीत क्षेत्रामध्ये रुची असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे विनंती या ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर तसेच मिशन आयएएससतर्फे प्रा. डॉ .नरेश चंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
       मुळचे अमरावतीचे असलेले श्री विराग वानखडे यांनी आता नवी मुंबई येथे मोठा चार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारलेला आहे. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात आठ विश्वविक्रम केलेले असून त्याबद्दल भारतातील मान्यवर राजकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्याच्या वेळोवेळी सत्कार केला आहे. 
       त्यामध्ये सर्वश्री अण्णा हजारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ व पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने कॅबिनेट मंत्री श्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा योग गुरु रामदेव बाबा सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा समावेश आहे.
      त्यांनी त्यांचा सत्कार केला आहे. याशिवाय भारतातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांनी देखील वेळोवेळी त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविले आहे. 
       श्री विराग वानखडे यांनी डोळ्यावर पट्टी बांधून सतत वर्षभर गाण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. तसेच रक्तदान पर्यावरण या क्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक विकासासाठी एक भव्य संगीतमय कार्यक्रम अमरावती येथे आयोजित करण्यासाठी त्यांचे अमरावतीला आगमन होत आहे.
००००००००००००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)    

विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
 (प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) (PRO)
 डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
    संवाद : 9371854706      हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...
Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...