अकोला : पावसाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक असल्याने अकोला शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक व भाजप प्रसिद्धीप्रमुख गिरीश कुमार जोशी यांनी केली आहे.
श्री गिरीश जोशी म्हणाले, "मनपा आयुक्त, महापौर व सभापती यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सफाई मोहिमेला गती द्यावी. राज्यात इतरत्र नाले सफाई अभियान सुरू झाले असून अकोल्यात मात्र अद्याप कामाला वेग आलेला नाही."
या भागात पाणी साचण्याची समस्या
मोठी उमरी, गीता नगर, शिवसेना वसाहत, डाबकी रोड, रणपिसे नगर, अकोट फाईल, न्यू तापडिया नगर, खरप परिसर, दुर्गा चौक, खडकी या भागांमध्ये पावसाळ्यात घरांमध्ये व रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
हद्दवाढ भागाचाही समावेश करा
शहरातील हद्दवाढ क्षेत्रासह अकोला महानगरात एकूण १४४ नाले आहेत. या सर्व नाल्यांच्या सफाईकडे ७ जूनपूर्वी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जोशी यांनी केली.
सकाळीच राबवा मोहीम
अकोल्यात सध्या उष्णतेची लाट आहे. कामगारांच्या आरोग्याचा विचार करून नाले सफाई मोहीम पहाटे किंवा सकाळच्या वेळेत राबवावी, असेही जोशी यांनी सुचवले.
००००००००००००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार (प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) (PRO) डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती संवाद : 9371854706 महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) (PRO)
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
संवाद : 9371854706 महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...
Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा