रेल्वेमंत्री वैष्णव यांचे खासदार अनूप धोत्रे यांनी मानले आभार
•अकोला : विदर्भ आणि कोकणच्या थेट कनेक्टिव्हिटीचे स्वप्न आता खऱ्या अर्थाने साकार झाले आहे. नागपूरची रसाळ संत्री अन् कोकणचा गोड मेवा; विदर्भ-गोवा प्रवासाचा हा आता कायमस्वरूपी ठेवा ठरणार आहे._ नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या 01139/01140 या विशेष गाडीचे नियमित एक्सप्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आता ही गाडी 11203/11204 नागपूर–मडगाव एक्सप्रेस या क्रमांकाने धावणार आहे.
या निर्णयाबद्दल मध्य रेल्वे तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे अभिनंदन करून खासदार अनुप धोत्रे यांनी विशेष आभार मानले. "रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक गाड्या सुरू केल्या आहेत. नागपूर-पुणे, हावडा यासाठी गाड्या सुरू झाल्या आहेत. गोव्याला कमी दरात जाण्यासाठी मध्यमवर्गीयांच्या सुविधेसाठी ही रेल्वे कायमस्वरूपी केली आहे," असे धोत्रे म्हणाले.
"प्रवाशांच्या प्लॅनिंगचं टेन्शन आता कायमचं संपलं आहे, कारण गोव्याची सहल आता केवळ स्वप्नात नाही, तर रेल्वेच्या कायमस्वरूपी वेळापत्रकात अवतरली आहे. हा सुखद प्रवास पर्यटनाला आणि व्यापाराला नवी गती देईल,"_ अशी प्रतिक्रिया धोत्रे यांनी दिली.
पुढील मागणी : उत्तर भारताला जोडणाऱ्या प्रयागराज, बनारस, अयोध्येसाठी सुद्धा अकोल्यातून गाड्या सुरू व्हाव्यात, असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला. सीहोर, खाटू श्याम, रामदेवरा, जैसलमेर यासाठी गाड्या सुरू झाल्याने प्रशासनाने चांगल्या सुविधा दिल्याचे त्यांनी सांगितले.
००००००००००००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार (प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) (PRO) डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती संवाद : 9371854706 महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) (PRO)
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
संवाद : 9371854706 महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...
Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा