श्री जनार्दनपंत बोथे दादांचा १ मे रोजी मुंबईतील लोकभवनात सत्कार
(प्रा.नरेशचंद्र काठोळे)
अमरावती : यावर्षी केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेले अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस,राष्ट्रसंतांचे स्वीय सहाय्यक, छायाचित्रकार तथा सुप्रसिद्ध समाजसेवी श्री जनार्दनपंत बोथे यांचा उद्या १ मे रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे लोकभवनात अर्थात पूर्वीच्या राजभवनात सत्कार आयोजित करण्यात व आला आहे. हा सत्कार माननीय राज्यपाल यांनी आयोजित केलेला आहे. श्री जनार्दनपंत बोथे दादा यांनी केलेल्या अतुलनीय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यानिमित्त त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होत आहेत. सन्माननीय राज्यपालांनी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार महाराष्ट्र शासनाच्या लोकभवनातील मलबार हिल येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा