गॅस वितरणाचा दैनंदिन आढावा, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन
•अकोला, दि. ३० (जिमाका) : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी गॅस एजन्सीला भेट देऊन गॅस सिलेंडर वितरणाचा आढावा घेतला. नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पेट्रोलियम कंपन्यांशी दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.
;जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. एचपी अकोला गॅस एजन्सी तसेच मालीवाल भारत गॅस एजन्सी येथे भेट देऊन वितरणाबाबत आढावा घेण्यात आला. घरगुती गॅसचा तुटवडा नसून ग्राहकांची केवायसी सुध्दा होत आहे.
गॅस एजन्सीमध्ये गॅस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांसोबत जिल्हाधिका-यांनी संवाद साधला. नागरिकांच्या गॅस सिलेंडर वितरणाबाबत विचारणा करण्यात आली. गॅस सिलेंडर वेळेत मिळत असल्याबाबत नागरिकांनी सांगितले.
भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन, प्रशासन आपल्या सोबत आहे, नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पेट्रोलियम कंपन्यांशी दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे याबाबत आवाहन यावेळी करण्यात आले.
०००००००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा