संपूर्ण भारतात 200 कोटीचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून फक्त एक रुपयामध्ये राहणे जेवणे व प्रशिक्षण या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या व या उपक्रमामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन...
जबलपूरला कुणबी समाजाचे 4 व 5 ला राष्ट्रीय अधिवेशन
(प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे)
संपूर्ण भारतात 200 कोटीचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून फक्त एक रुपयामध्ये राहणे जेवणे व प्रशिक्षण या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या व या उपक्रमामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन उत्तर प्रदेशचे सुप्रसिद्ध सेवानिवृत्त आयएएस अधिकारी श्री निरंजन यांच्या अध्यक्षतेखाली व राजपत्रित अधिकारी श्री एल पी पटेल मार्गदर्शनाखाली येत्या ४ व ५ तारखेला जबलपूर येथे होत आहे.
भारतातल्या सर्व राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेच्या या येत्या ४ व ५ एप्रिलला मध्य प्रदेशातील जबलपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनामध्ये मराठा देशमुख कुणबी या जातीमधील पोटजातीमधील सर्व कुणबी बांधव सहभागी होऊ शकतात. बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे.
या अधिवेशनासाठी श्री संजय पाटील अध्यक्ष महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात जवळपास सव्वाशे प्रतिनिधी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे पूर्व अध्यक्ष डॉ.मंगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात कुणबीस महासभा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून महाराष्ट्रात देखील शिर्डी येथे अखिल भारतीय कुणबी महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन झाले आहे.
जबलपूरचे हे अधिवेशन जबलपूर येथील सुप्रसिद्ध दाऊ मॅरेज गार्डन महाराजपूर मध्ये संपन्न होणार आहे. या अधिवेशनाला अतिथी म्हणून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री मनसुख मालवीय, केंद्रीय अर्थमंत्री श्री पंकज चौधरी, केंद्रीय मंत्री श्री ज्योतीरादित्य शिंदे केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री व सुप्रसिद्ध वक्त्या श्रीमती अनुप्रिया पटेल तसेच अमरावतीच्या सुकन्या व मध्य प्रदेश येथे खासदार असलेल्या लता वानखडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
4 एप्रिल रोजी महिलांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण भारतातून विविध राज्यातून आलेल्या महिला सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अमरावतीच्या अखिल भारतीय कुणबी महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या अध्यक्ष प्रा. डॉ. शोभा गायकवाड या सहभागी होणार आहेत.
प्रकाशन
याच कार्यक्रमात प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी लिहिलेली स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी हे पुस्तक हिंदीमध्ये भाषांतरित करण्यात आले. आय ए एस की एबीसीडी या नावाने ते या राष्ट्रीय अधिवेशनात प्रकाशित होणार आहे. तसेच याप्रसंगी अधिवेशनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन श्रीमती अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या स्मरणिकेचे संपादन भोपाळचे श्री अरुण पटेल यांनी केलेले आहे.
सत्कार
या अधिवेशनामध्ये संपूर्ण भारतात सामाजिक काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. दोन दिवसाच्या या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी फक्त महिलांचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होणार आहे. दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय कुणबी महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होणार आहे.
या अधिवेशनाला अमरावतीहून जाणाऱ्या प्रतिनिधींसाठी अमरावती जबलपूर ही रेल्वे उपलब्ध आहे. या अधिवेशनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अधिक माहितीसाठी अखिल भारतीय कुणबी महासभेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री नरेशचंद्र काठोळे मो. नं. 9890967003,
राज्य महिला अध्यक्ष प्रा. डॉ.शोभा गायकवाड 9096825979,
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री संजय पाटील मुंबई 7745048505,
पूर्वाध्यक्ष डॉ. मंगेश देशमुख9284823521
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
लेखक : प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक,मिशन आयएएस,अमरावती.
संवाद :9890967003
०००००००००००००००००००००००००
SUPER NEWS 24 विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
SUPER NEWS 24
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
संवाद : 9371854706
महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा