• अकोल्याच्या श्रीराम भजनी मंडळाने संतनगरी शेगावात सादर केली बहारदार भजने
अकोला :
श्रीराम भजनी मंडळ जुने खेतान नगर, कौलखेड, अकोलाच्या वतीने अलिकडेच विदर्भाची पंढरी समजल्या जाणाय्रा संतनगतरी शेगावच्या संत श्री गजानन महाराज मंदिरात महिला मंडळींनी बहारदार भजने सादर करुन भाविक भक्ताना मंत्रमुग्ध केले. मंदिर परिसरातील भाविकांनी महिला भजनी मंडळीची स्तूती केली.
आताच्या अत्याधुनिक जगात एक विशिष्ट वयानंतर छंदाना वाव मिळणे अशक्य असते. घरसंसार यामधून वेळ काढणे तर त्याहीपेक्षा कठीण, अशा धकाधकीच्या जीवनात देव भक्तीचा छंद बाळगत अकोला येथील प्रख्यात श्रीराम भजनी मंडळ जुने खेतान नगर कौलखेड अकोला हे भजनी मंडळ एक महिला भजनी मंडळ असून त्यांच्या सरावांना यश आणि नारीशक्ती एकवटून मंडळाला दिनांक:- 24/03/2025 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव जिल्हा बुलढाणा येथे भजन रंगारंग कार्यक्रमाची संधी मिळाली. याच संधीचे सोन तसेच त्यांच्या सरावास यश, महिला भजन मंडळ यांच्या भजनाचा बहारदार कार्यक्रमाने संपूर्ण श्री संत गजानन महाराज संस्थान दुमदुमले.
महिला भजनी मंडळाच्या सौ. लता वानखडे ताई. (अध्यक्षा) सौ. पुष्पलता तांदळे. (उपाध्यक्षा), सदस्या सौ.अनु उर्फ निर्मला शेंडे, सौ. शोभा धरमठोक, सौ. उज्वलां महाजन, श्रीमती. शोभा सपकाळ, श्रीमती केशर ताथोड, सौ. प्रतिमा रोठे सौ. सविता मासकर, सौ. उषा मेहेरे, सौ. नंदा भारसाकडे, श्री. मोहोड दादा (तबलावादक) श्री. पेटी वादक यांनी अथक परिश्रम घेत शानदार भजने म्हटली, असे श्रीराम भजनी मंडळ जुने खेतान नगर, कौलखेड, अकोलाच्या अध्यक्षा सौ. लता वानखडे यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा