मुख्य सामग्रीवर वगळा

•  स्व.रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनची स्थापना


• 29 ला पुणे येथे रितसर उद्घाटन अनेक मान्यवरांची उपस्थिती

पुणे दि.28 :   माजी राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांचे स्विय सहाय्यक म्हणून ज्यांनी पाच वर्षं राष्ट्रपती भवनात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य केले, तसेच अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त म्हणून ज्यांनी कुंभ मेळ्याचे उत्कृष्ट आयोजन केले, पुणे येथे राज्य माहिती आयुक्त असताना त्यांनी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असे सर्वांनाच आवडणारे श्री रवींद्र जाधवसाहेब आपल्याला परीचीत आहेतच. यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वर अतोनात प्रेम असणाऱ्या सर्व आप्त जनांनी, मित्र मंडळीने रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशनची स्थापना येत्या शनिवारी  दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार आयोजित केली आहे. हा कार्यक्रम पुण्याच्या बाणेर विभागातील बीबीसी टॉवरमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ कांतीलाल संचेती व पुणे विभागीय आयुक्त श्री डॉ चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी(भा.प्र.से.), त्यांच्या पत्नी कमांडंट सी.आर.पी.फ. ग्रुप १, श्रीमती अंचल दलाल (भा.पो.से.), सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील (भा.प्र.से.), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंह, (भा.प्र.से.), वेकफील्ड कंपनी चे कार्यकारी संचालक श्री मुकेश मल्होत्रा, महाराष्ट्राचे माजी ॲडीशनल डायरेक्टर जनरल श्री टीकमचंद एस.भाल(भा.पो.से.), माजी विभागीय आयुक्त औरंगाबाद डॉ पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से.), माजी कार्यकारी संचालक म्हाडा श्री अरूण डोंगरे(भा.प्र.से.), पुणे झोन १ चे पोलिस उपायुक्त श्री संदीप सिंग गिल,छ.संभाजी नगर चे माजी खासदार श्री उत्तम सिंह पवार, माजी क्रुषी आयुक्त श्री उमाकांत दांगट(भा.प्र.से.), माजी आदीवासी आयुक्त श्री संभाजी सरकुंडे(भा.प्र.से.), नेत्रतज्ज्ञ डॉ संदीप डोळे, श्रीमती ज्योती राठौर, श्री जयेश राठौर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्री रवींद्र जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या स्व.रवींद्र जाधव ग्लोबल  फाउंडेशनच्या कार्यक्रमाला  संपूर्ण महाराष्ट्रातुन  त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक श्री विरेंद्र सिंह बोराडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाअन्वये केले आहे,असे प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आय ए एस अमरावती कॅम्प यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...