मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

•  सावधान, उभे राहून पाणी पिताय?  •  होतील हे दुष्परिणाम     आ जकालत. तसेच ते उभे असताना पाणी पितात. असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. बऱ्याचदा आपण पाहिले असेल काही जण नेहमीच पाणी पिताना बसून पाणी पितात. तर काहींना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. पण या सवयीमुळे आपलेच नुकसान होते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, उभे राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये, त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे पोटाच्या समस्याही वाढू शकतात. जर तुम्ही चालताना उभे राहून पाणी पीत असाल तर काळजी घ्या, कारण या स्थितीत पाणी पिल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. उभे राहून किंवा झोपून पाणी पिणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. बसून  आरामात पिणे पाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पाणी पोहोचते आणि आपले काम योग्य प्रकारे करू शकते.     उभे राहून पाणी पिण्याचे तोटे पुढीलप्रमाणे        मूत्रपिंडांवर होतो परिणाम   मूत्रपिंडाच्या रुग्णांनी उभे राहून पा...
• रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय  •  बडनेरा-नाशिकरोड रेल्वेच्या  ९२ फेऱ्या वाढविल्या अमरावती : विदर्भातून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बडनेरा ते नाशिक रोड व नाशिक रोड ते बडनेरा या विशेष गाडीच्या प्रत्येकी ९२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंतच ही गाडी धावणार होती. मात्र आता त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयानुसार या विशेष गाडीची सुविधा आता १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.          विदर्भातील बहुतांश तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईची वाट धरतात. औद्योगिकदृष्ट्या विकसित नाशिक जिल्हा देखील आता रोजगाराच्या बाबतीत पुढे आला आहे. पश्चिम विदर्भातील असंख्य तरुण नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने नाशिक येथे राहतात. धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून देखील नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. पुणे, मुंबईला जाण्यासाठीसुद्धा नाशिक हे मध्यवर्ती ठिकाण ठरते. त्यामुळे नाशिकला जाणाऱ...
• जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून  •  अमरावतीत स्पर्धा  परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा      अमरावती, दि. 27 : अमरावती जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम व प्रभावी व्हावे, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.   यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.      या कार्यक्रमात अमरावती शहरातून आयएएस (IAS) झालेले तसेच एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी उपस्थित राहणार असून, या वेळी त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे.        जिल्हाधिकारी श्री. येरेकर  तसेच यशस्वी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्यांच्या यशाचे रहस्य, अभ्य...
  धरणाची  आजची जलपातळी •  काटेपूर्णा (महान धरण ) प्रकल्प जल पातळी टक्केवारी १७:२४% •   अकोला पाटबंधारे विभाग अकोला  दि 27/06/2025 Time -7:00 AM   (1)  काटेपूर्णा प्रकल्प    पातळी 340.53 मी साठा 14.889                 mmg3  टक्केवारी 17.24% •  आजचा पाऊस  32mm •  एकूण पाऊस    64 mm •  गेट  00  open   00  सेमी. discharge 00.00 cumecs  2)  वान प्रकल्प ता,तेल्हारा     पातळी 396.27 मी साठा.  28.82mm3       टक्केवारी 35.16%      आजचा पाऊस    45mm      एकूण पाऊस    145 mm       गेट 00 open    00  सेमी       Discharge 00.00 cumecs.   3)  मोर्णा प्रकल्प ता पातूर पातळी  362.00 मी साठा      16.93 mm3 टक्केवारी 40.84% आजचा पाऊस 104 mm एकूण पाऊस 172 mm सांडवा.    ...
• भक्तिरसाने ओथंबलेला स्वागत सोहळा •  बीड जिल्ह्यात संत वासुदेव महाराज पालखीचे भक्तीमय स्वागत •  टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगगानाच्या निनादात संतांची वारी पुढे सरसावली         (गजानन हरणे यांजकडून LIVE) अकोला : माऊलींच्या नामस्मरणात भिजलेल्या पावलांनी, भक्तीरसाच्या सागरात न्हालेल्या मनांनी आणि अखंड टाळ-मृदुंगांच्या गजरात श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट येथून प्रारंभ झालेला विदर्भ माऊली श्री संत वासुदेव महाराज (उपाख्य ज्ञानेश्वरदास) यांचा पालखी सोहळा आता बीड जिल्ह्यात भक्तिभावाने दुमदुमलेल्या वातावरणात पोहोचला आहे.       या वारीचा प्रवास अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी मार्गे होऊन अखेर बीड जिल्ह्यात साश्रु नेत्रांनी आणि मंगलगर्जनेसह स्वागत झाले. ही केवळ पारंपरिक यात्रा नसून, तीच एक चालतं-बोलतं अध्यात्मिक विद्यापीठ ठरली आहे. 📿  बीड जिल्ह्याचे भक्तिमय स्वागत  : पालखी बीडमध्ये दाखल होताच जिल्ह्याच्या मातीने भक्तिरंग चढवला. शहराच्या दाराशी स्वागत समितीने उभं राहून फुलांची उधळण, जयजयकार, आणि अभंगाच्या ओळी गात महाप्रसादाच्या आयोजनातून सेवाभाव ...
                                     तुळस माझी भाग्याची                       लेखिका            •  नीता चंद्रकांत कुलकर्णी               पुणे. संवाद 9763631255         स खु बरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखुनी लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून  तुळशीची पूजा केली. हार घातला. भक्तीभावानी नमस्कार केला.      "बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल        श्री ज्ञानदेव तुकाराम        पंढरीनाथ महाराज की जय "  असा गजर करून सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल. म्हणाली,  'तुळशीबाई चला निघुया वारीला....' हा सोहळा ईतरं झाडं कौतुकानी बघत होती.       "किती ग भाग्यवान, दरवर्षी वारी घडते तुला".       "ये गं बाई जाऊन..." ...
•अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृतीची गरज  • उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी  •  नशाबंदी मंडळाचे रेल्वे प्लॅटफॉर्म क्र.१वर पोस्टरद्वारे जागर        अकोला ---आपल्या देशात अमली पदार्थाचे वाढते सेवन ही भयावह समस्या उभी ठाकली आहे. अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी केले.        नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व मध्य  रेल्वे, सर्वोदय मंडळ यांचे वतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शनीचे कार्यक्रमात बोलत होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव  भुईभार, श्रीकृष्ण विखे पाटील, अकोला रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष कवडे, नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक बबनराव कानकिरड, प्रा. दत्तात्रय भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.     राजश्री शाहू महाराज जयंती दिनी 26 जून हा दिवस अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. नशाबंदी मंडळ अकोला ची वतीने अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर अमली पदार्थ व व्यसनांचे दुष्परिणाम बाबतची पोस्टर प्रदर्शनी ...