मुख्य सामग्रीवर वगळा

•अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृतीची गरज 
• उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी 


•  नशाबंदी मंडळाचे रेल्वे प्लॅटफॉर्म क्र.१वर पोस्टरद्वारे जागर 

      अकोला ---आपल्या देशात अमली पदार्थाचे वाढते सेवन ही भयावह समस्या उभी ठाकली आहे. अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी केले.
       नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व मध्य  रेल्वे, सर्वोदय मंडळ यांचे वतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शनीचे कार्यक्रमात बोलत होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव  भुईभार, श्रीकृष्ण विखे पाटील, अकोला रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष कवडे, नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक बबनराव कानकिरड, प्रा. दत्तात्रय भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
   राजश्री शाहू महाराज जयंती दिनी 26 जून हा दिवस अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. नशाबंदी मंडळ अकोला ची वतीने अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर अमली पदार्थ व व्यसनांचे दुष्परिणाम बाबतची पोस्टर प्रदर्शनी द्वारे जनजागरण  करण्यात आले होते.
    अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून तरुणाईला परावृत्त  करण्यासाठी नशाबंदी मंडळाचे वतीने 26 जून पासून जिल्ह्यातील शाळा कॉलेज व गर्दीच्या ठिकाणी पोस्टर प्रदर्शनाद्वारे अमली पदार्थ विरोधी जागर करण्यात येत असल्याची माहिती नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक बबनराव  यांनी दिली.
        अकोला रेल्वे स्टेशन प्रवाशांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी नेहमी सजग राहिले आहे. चाईल्ड केअर सारखा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून  राबवून प्रवाशांचे प्रबोधन केले जात असल्याची माहिती स्टेशन प्रबंध संतोष कवडे यांनी दिली .
         प्रवाशांना अमली पदार्थांचे व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणारे पत्रके वाटप करण्यात आली. शीघ्र कवी तेजीराव भिसे, रामराव  पाटेखेडे व संतोष बर्गे यांनी व्यसनमुक्ती वरील सुश्राव्य कविता सादर केल्या.
स्टेशन सहाय्यक मनोज पहूरकर , स्वास्थ्य निरीक्षक शिवकुमार माळी, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक रजनीकांत, राज्य लोहमार्ग  पोलीस निरीक्षक  अर्चना गाढवे ,चाइल्ड केअर चे सुपरवायझर पद्माकर सदाशिव, स्वप्निल शिरसाठ,तिकीट निरीक्षक संघदीप वानखेडे, कृष्णकांत पांडे, जयकुमार जमदाडे, अनिल धाडसे, मोहम्मद अली, अशोक रामटेके ,सर्पमित्र बाल कालणे ,आकाश इंगळे यांचे सह सर्वोदय , नशाबंदी  मंडळाचे कार्यकर्ते व व्यसनमुक्त युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते. 
         कार्यक्रमाचे संचालन सर्वोदय मंडळाचे सचिव डॉक्टर मिलिंद निवाने यांनी केले .आभार प्रदर्शन अनिल मावळे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...