मुख्य सामग्रीवर वगळा

• रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय 

•  बडनेरा-नाशिकरोड रेल्वेच्या 
९२ फेऱ्या वाढविल्या



अमरावती :
विदर्भातून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बडनेरा ते नाशिक रोड व नाशिक रोड ते बडनेरा या विशेष गाडीच्या प्रत्येकी ९२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंतच ही गाडी धावणार होती. मात्र आता त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयानुसार या विशेष गाडीची सुविधा आता १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


         विदर्भातील बहुतांश तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईची वाट धरतात. औद्योगिकदृष्ट्या विकसित नाशिक जिल्हा देखील आता रोजगाराच्या बाबतीत पुढे आला आहे. पश्चिम विदर्भातील असंख्य तरुण नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने नाशिक येथे राहतात. धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून देखील नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. पुणे, मुंबईला जाण्यासाठीसुद्धा नाशिक हे मध्यवर्ती ठिकाण ठरते. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण अगोदरच फुल्ल होऊन जात असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होते. ही अडचण दूर करण्यासाठी पश्चिम विदर्भातील बडनेरा रेल्वे स्थानकावरून नाशिक रोड रेल्वे स्थानकासाठी अनारक्षित विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ही गाडी नियमितपणे सुरू आहे. या रेल्वे गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभतो. या रेल्वे गाडीची मुदत येत्या ३० जून रोजी संपुष्टात येणार होती. त्यामुळे प्रवाशांची पुन्हा एकदा मोठी अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने बडनेरा नाशिक रोड विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष, पूर्वी ३० जूनपर्यंत चालवण्याची सूचना होती. ती आता ०१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या रेल्वे गाडीच्या ९२ सेवा होतील.


 ट्रेन क्रमांक ०१२१२ नाशिक रोड -बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष गाडी आता ०१ जुलै ते ३० स्पटेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या 
गाडीच्या देखील ९२ सेवा होतील. या गाडीच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. या विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या विशेष रेल्वे गाडीमुळे पश्चिम विदर्भातून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा झाली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...