मुख्य सामग्रीवर वगळा

                            
        तुळस माझी भाग्याची

                     लेखिका
           •  नीता चंद्रकांत कुलकर्णी
              पुणे. संवाद 9763631255


       खु बरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखुनी लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून  तुळशीची पूजा केली. हार घातला. भक्तीभावानी नमस्कार केला.

     "बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल 
      श्री ज्ञानदेव तुकाराम 
      पंढरीनाथ महाराज की जय "
 असा गजर करून सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल. म्हणाली, 
'तुळशीबाई चला निघुया वारीला....' हा सोहळा ईतरं झाडं कौतुकानी बघत होती.
      "किती ग भाग्यवान, दरवर्षी वारी घडते तुला".
      "ये गं बाई जाऊन..."
      "विठुरायाला रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग" असं म्हणून झाडांनी तिला हात जोडले. 
      "मी कुठली जाते ....सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते म्हणून घडतं बघा. येते हं जाऊन..."
असं म्हणतं  झाडांचा निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला.... खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा .ती या दिवसाची वाट पाहत असायची. दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा... अभंग, गौळणी, हरिपाठ, ओव्या कानी पडायच्या.  साध्याभोळ्या फुगड्या खेळणाऱ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं. आनंदाने ती हरखुन जायची. वरूणराजा बरसायचा.. ते पाणी अंगावर पडलं की तिला कृतार्थ झालो अस वाटायचं. रिंगणाचा सोहळा सुरू झाला की पळणाऱ्या आश्वाकडे ती आश्चर्याने बघायची.
      दिंडीत चालताना शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग रुक्मिणी होती. तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या....
 त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती.

      सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याचं ओझं सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तुळशीकडे बघायची. तुळशी बाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची.... "किती प्रेम करतेस ग"..म्हणून सखूची आलाबला घ्यावी असं तिला वाटायचं.
      मुक्कामी पोचल्यावर खाली ठेवलं तरी येता जाता वारकरी श्रद्धेनी वाकून नमस्कार करायचे. सखू तुळशी, मंजिऱ्या पालखीतल्या पादुकांना अर्पण करायची तेव्हा तर तुळशी बाईला अपार आनंद व्हायचा.. देवाच्या पायी जाऊन आपला जीव सार्थकी लागला असं तिला वाटायचं... वारकऱ्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.
     लांबवर पालख्या दिसायच्या.... तो अनुपम सोहळा किती बघु आणि किती नको असं तीला होऊन जायचं.. आपल्या भाग्याचा तीला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं. 
     "तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला
      कसा बाई तिनी गोविंद वश केला"
तेव्हा डोळ्यासमोर श्रीकृष्णाचं मोहक रूप  दिसायचं...
       वारी पंढरपूरला पोहोचल्यावर सखु चंद्रभागेच्या पाण्याने तिला न्हाऊ घालायची.. त्यावेळी तिचे पानंपान थरथरायचे.....
      वारी पंढरपूरला चालली आहे... तुळशी बाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या ताई माईंचे मला अपार कौतुक वाटतं. अगदी सहजपणे डोक्यावर वृंदावन घेऊन या बायका लगबगीने चालत असतात.. त्यांना बघायला मी वारीत जात असते... त्यांच्यातला साधा, निरागस भाव, गोडवा बघण्यासारखा असतो....
आपण काही विशेष करत आहोत हे या बायकांच्या गावी पण नसतं... पायात साध्या चपला नाहीतर स्लीपर असतात. आनंदाने भराभर चालत असतात. त्यांच्या तुळस प्रेमाचे मला फार अप्रूप  वाटते.
      त्यांना माझा साष्टांग दंडवत.
त्यांच्यासाठी हात जोडून देवाला विनवते...
      "वारीत वाहता तुम्ही डोक्यावर तुळस...
      म्हणूनच दिसतो तुम्हा विठुरायाचा कळस...
      रुक्मिणी मातेला करते नवस...
       सुखी ठेव माझ्या या आया बहिणीस..."
 
        ©®नीता चंद्रकांत कुलकर्णी,
            पुणे, 9763631255
(आवडल्यास सामायिक करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)


     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...