मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुसळधार पावसात भक्तीचा महापूर.. विश्वमाऊलीच्या चरणी नतमस्तक गुरुमाऊली!                   लेखक :    वृत्तदर्पण..✍️ राजेंद्र काळे  मातृतिर्थ सिंदखेडराजा.. परिवर्तनाचा केंद्रबिंदू. _याच मातीतून परिवर्तनाची ललकारी ठोकल्या गेली होती ती, मुघल साम्राज्य विरोधात. राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जन्म जेंव्हा झाला, तेंव्हा याच सिंदखेडनगरीत हत्तीवरुन साखर वाटल्या गेली होती ती लखुजी राजे जाधव यांच्या माध्यमातून. अनेक चळवळी व विचार याच सिंदखेडराजातून पुढे गेले. मराठा सेवा संघाची ही तर कर्मभूमी, जिजाऊ सृष्टी असो की, शिवधर्मपीठ.. परिवर्तनाचा दिपस्तंभ मानल्या जातो. अनेक वारकरी चळवळी सुध्दा याच नगरीत झाल्या त्या टाळ-मृदुंगाच्या निनादात. इथं विणेचा गजर झाला, अन् तलवारींचा खणखणाट सुध्दा!_ अशा सिंदखेडराजा नगरीत काहीतरी भव्य-दिव्य करण्याचे स्वप्न महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांचे म्हणा की, पीठांचे.. असतेच. असंच एक भक्तीपीठ म्हणजे श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी. आज या केंद्राचा विस्तार महाराष्ट्रभर झाला आहे. लाखोंच्या संख्येत सेवेकर...
      श्री बाबा व सौ. वैशाली आणि जीवनगौरव पूरस्‍कार. . .                                  लेखक :            © निशिकांत, अकोला.           संपर्क  -९८५०३४२४०४     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नभांगणात अनगिनत तारे आहेत. आपल्या आपल्या कार्याने ते प्रकाश पसरवीत असतात...निश्चल, निर्मोहीपणे आणि कोणताही गवगवा न करता. यातील अनेकांना जवळून अनुभवता आलं, हे आमचं  भाग्य!  श्री. दिनकर नारायणराव उपाख्य बाबा देशपांडे हे मूळ अकोला निवासी. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या अकोल्‍यातील काळा मारोती प्रभात शाखेचे स्‍वयंसेवक.  श्रीमती ल.रा. तो. वाणिज्‍य महाविद्यालयातून वाणिज्‍य शाखेत पदवी घेतली. संघ दृष्‍टया तृतीय वर्ष शिक्षित. तीन वर्षे दि अकोला अर्बन को-ऑप बँकेत सेवा दिली. पराकोटीची संघनिष्ठा, त्याग, समर्पण ही मूल्ये प्रत्यक्ष ज्यांच्या जीवनात  अनुभवावयास येतात त्‍या बाबा सरांनी ख़ुप संघर्ष करून, अत्यंत परिश्रमाने आपल जीवन...
मे महिना : उन्हाळा की पावसाळा मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? जाणून घ्या माहिती ... अकोला :    मे  महिना म्हणजे उन्हाळ्याचा कडाका, आंब्याचा हंगाम आणि शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्या. पण यंदा मे 2025 मध्ये महाराष्ट्रात पावसाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.  मे महिन्यात पावसाचे कारणे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे समुद्रातील वाफेने भरलेली हवा वर उचलली गेली आणि त्यामुळे मुसळधार पाऊस झाला. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे depression मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभ भूमध्यसागरातून येणारे थंड वारे उत्तर भारतात येऊन उष्ण हवेला वर ढकलतात. यामुळे आर्द्रता वाढते आणि पाऊस पडतो. यंदा हे विक्षोभ महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. ला नीना प्रभाव ला नीना परिस्थिती सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते. यंदा ही परिस्थिती सक्रिय असल्यामुळे मे महिन्यातच जास्त पाऊस पडत आहे. हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड आणि प्रदूषणामुळे हवामानाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे पावसाचे वेळापत्रक बदलत आहे आणि अनियमित पावसाचे प्रमाण वा...
            •  तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार •  पावसाळ्यात तर फार उपयोगी...        आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते.         तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने चावून खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, श्वसन संस्थेस मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. या सर्व कारणांमुळेच तुळशीची पाने चावून खाणे ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित  सवय ठरते.                   तुळशीच्या पानांत नैसर्गिक औषधी गुण असून सर्दी-खोकला आणि ताप यांपासून संरक्षण मिळते, तसेच त्वचेचे आणि पचनाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. तुळशीमध्ये जीवनस...
•  शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये  मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार मुंबई, दि 25:  या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.  या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या...
सैंधव मिठ   आज आपण सैंधव मीठाची जन्मकहाणी पहाणार आहोत व याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत. हिमालयन मीठ (सैंधव) हे मिठाच्या खाणींमधून मिळवले जाते. हे मीठ ज्याप्रकारे पृथ्वीवर निर्माण झाले, ती अतिशय रोचक भौगोलिक घटना आहे. पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्र आटल्यानं प्रचंड मिठागरं तयार झाली. पृथ्वीवर जी प्रचंड उलथापालथ त्या काळात झाली, त्यात या मिठागरांच्या आजूबाजूचे मोठाले दगड त्यावर येऊन मिठागरं त्या पर्वताखाली दाबली गेली. त्यातूनच आजच्या मिठाच्या खाणी तयार झाल्या. या खाणींचा शोध पाकिस्तानातील एका प्रांतात अलेक्झांडरच्या सैनिकांना लागला. या सैनिकांना काही घोडे मिठाचा अंश असलेले दगड चाटत असताना दिसले.  त्यावरून तिथल्या मिठाच्या खाणींचा अंदाज आला. अकबराच्या काळात त्यानं मिठाचं प्रमाणीकरण केलं. खेवरा त्याचं नाव. त्यानंतर मिठाची खरेदी-विक्रीही सुरू झाली. नंतरच्या काळात ब्रिटिशांनीदेखील खाणींमधून मीठ बाहेर काढायच्या पद्धती विकसित केल्या. 1827 साली ‘रूम आणि पिलर’ या पद्धतीनं मिठाचं उत्पादन आणि काढणी सुरू केली. अकबर आणि ब्रिटिशांच्या काळात मीठ काढण्याची जी कौशल्यं रुजली त्यानुसार आजही ...
•  जिल्हास्तरावरील शासकीय कार्यालय स्पर्धेत   •    सहाय्यक संचालक नगर रचना अकोला शाखा कार्यालय  राज्यातून प्रथम... मुख्यमंत्र्यांनी केला निकाल जाहीर...         अकोला : राज्य शासनाच्या "१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत", राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल काल मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अकोला येथील सहाय्यक संचालक, नगर रचना कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, हा गौरव प्राप्त करणारे हे एकमेव नगर रचना कार्यालय ठरले आहे.              अकोला येथील नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाने श्री. सादिक ग. अली, सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या कुशल नेतृत्वाखाली केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे हे यश शक्य झाले आहे. कार्यपद्धतीतील व्यावसायिकता, पारदर्शकता, वेळेवर सेवा पुरवण्याची कटिबद्धता आणि नवोन्मेषी दृष्टिकोन यांनी विभागाने राज्यभरात स्वतःची स्वतंत्र छाप उमटवली आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असले...