मुख्य सामग्रीवर वगळा

सैंधव मिठ
 



आज आपण सैंधव मीठाची जन्मकहाणी पहाणार आहोत व याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत.
हिमालयन मीठ (सैंधव) हे मिठाच्या खाणींमधून मिळवले जाते. हे मीठ ज्याप्रकारे पृथ्वीवर निर्माण झाले, ती अतिशय रोचक भौगोलिक घटना आहे. पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्र आटल्यानं प्रचंड मिठागरं तयार झाली. पृथ्वीवर जी प्रचंड उलथापालथ त्या काळात झाली, त्यात या मिठागरांच्या आजूबाजूचे मोठाले दगड त्यावर येऊन मिठागरं त्या पर्वताखाली दाबली गेली. त्यातूनच आजच्या मिठाच्या खाणी तयार झाल्या. या खाणींचा शोध पाकिस्तानातील एका प्रांतात अलेक्झांडरच्या सैनिकांना लागला. या सैनिकांना काही घोडे मिठाचा अंश असलेले दगड चाटत असताना दिसले. 


त्यावरून तिथल्या मिठाच्या खाणींचा अंदाज आला. अकबराच्या काळात त्यानं मिठाचं प्रमाणीकरण केलं. खेवरा त्याचं नाव. त्यानंतर मिठाची खरेदी-विक्रीही सुरू झाली. नंतरच्या काळात ब्रिटिशांनीदेखील खाणींमधून मीठ बाहेर काढायच्या पद्धती विकसित केल्या. 1827 साली ‘रूम आणि पिलर’ या पद्धतीनं मिठाचं उत्पादन आणि काढणी सुरू केली. अकबर आणि ब्रिटिशांच्या काळात मीठ काढण्याची जी कौशल्यं रुजली त्यानुसार आजही मीठ काढलं जातं. आता उत्तर पाकिस्तानात असलेल्या झेलम ते सिंधू नदीच्या 186 मैल परिसरात या मिठाच्या खाणी सापडतात. हिमालयाच्या या रांगांत या भागात सहा मुख्य खाणी आहेत, त्यातलं मीठ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, वेगळं आणि शुद्ध असतं. मीठ काढण्याच्या या अनेकविध पारंपरिक ज्ञानावर आधारित पद्धतीनं मिठाची शुद्धता अबाधित राहिली. आजही त्याच प्रकारे या खाणींचं उत्खनन होऊन सैंधव मीठ मिळवलं जातं. या संपूर्ण हिमालयन भागात प्रचंड मोठय़ा प्रमाणात मिठाचे साठे आहेत. या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजं असल्यामुळे हे आरोग्याला अतिशय हितकारक मानलं जातं. अर्थात या मिठात आयोडिनचं प्रमाण कमी आहे, मात्र त्यात अनेकविध खनिजं भरपूर प्रमाणात सापडतात.जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.
सर्व प्रकारच्या मीठांमुळे शरीराचा पीएच संतुलित राहणे,गॅस व जळजळ कमी करणे,पचनाला चालना देणे हे फायदे होतात.पण हिमालय मीठामुळे अन्नाला अधिक चांगली चव येते.याचे कारण असे की फक्त याच मीठात ११८ मिनरल्सपैकी ८४ ते ९२ मिनरल्सचे घटक आढळतात.तसेच ते १०० टक्के नैसर्गिक असते.ते अनरिफाईंड असल्यामुळे त्यात प्रदुषित व सोडीयम घटक कमी असतात.हे मीठ मेडीकल थेरपी साठी देखील वापरण्यात येते.यात जवळपास सर्वच प्रकारची मायक्रोन्युट्रीयन्टस आहेत बाजारातून हीच जर विकत आणायची ठरवली तर हजारो रुपये लागतील.या मिठाला पहाडी मीठ असे ही म्हटले जाते. या मिठामुळे असलेल्या इतर तत्वांमुळे या मिठाचा रंग शुभ्र दिसत नाही.पूर्वीच्या तुलनेत आता लोकांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यायामासोबतच आहाराकडेही जरा बारकाईनं पाहिलं जात आहे. स्वयंपाकात मीठ हे लागतंच.  पण मिठाच्या कमी जास्त प्रमाणाचा आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होतो. म्हणूनच आता मीठ घेतानाही लोक जास्तच जागरूक झाले आहेत.  आणि म्हणूनच मिठामध्ये अनेक प्रकार असले तरी आरोग्याचा विचार आला की सैंधव मिठाला प्राधान्य दिलं जातं. या मिठाच्या अन्न पदार्थांमधील वापरामुळे शरीरातील रक्तदाब स्थिर ठेवून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन साधलं जातं. यात पोटॅशिअमची मात्रा जास्त असते, तर सोडिअमची मात्रा  त्यामानानं कमी असते. म्हणूनच  सैंधव मीठ दोषशामक मीठ असल्याचं मानलं जातं.पण दिवसाला सहा ग्रॅमपेक्षा जास्त मात्रेत हे मीठ खाऊ नये. कोणत्याही मिठाचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास ते शरीराला अपायकारक ठरतं. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हे मीठ वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरावं. सैंधव मीठ हे मात्रेनुसारच वापरतो आहोत ना याकडे लक्ष ठेवावं.

फायदे

१. सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

२. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते शांतपणे झोप येते.

३. पित्त झाल्यावर आलं लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्त मुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते

४. अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो.

५. सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.

६. अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.

७. कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

८. आयरनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास उपयुक्त असते.
९सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचं आहे. मृत त्वचा या मिठानं निघून जाते. त्वचा पेशी मजबूत होऊन त्वचा तजेलदारदेखील दिसते. 
१० काही आजारपणामुळे, विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात, ते काढण्यासाठीदेखील सैंधव मिठाचा उपयोग होतो. 
११  केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शाम्पू सोबत करता येतो.  केस गळती, केसांचं तुटणं कमी होतं.
 १२सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं टॉन्सिल्सवर आराम पडतो. 
१३ श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठय़ा शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.
 १४  हे मीठ रेचक म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान-मोठय़ा कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. 
 १५ सैंधव मीठ संधिवातावर, काही कीटक चावल्यावर जखम बरी करण्यासाठीदेखील वापरलं जातं.
१६  स्ट्रेस अर्थात ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. कारण अगदी क्षुल्लक असतं मात्र त्यातून अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोकं वर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सेंधा मिठाचं सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.
१७साध्या पाण्यात घालून या मिठाचं सेवन करता येतं. ते रोज खाल्लं तर अस्वस्थता आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते. गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवानं वाटतं.
१८  वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. गाड्या, बसेसच्या धुराने होणारे वातावरणातले प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. निसर्गाचा तोल सांभाळण्याचं कामही मीठ करतं.
 १९ या मिठाच्या सेवनानं चरबी कमी होते. या मिठातल्या खनिज तत्त्व इन्शुलिनला रिअँक्टिव्ह असल्यानं साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते.  हे मीठ  वजन वाढीवर नियंत्रण ठेवायलाही मदत होते.
२०  रक्तदाब स्थिर ठेवणं, चयापचय क्रिया नियंत्रित करणं, वायुसरणावर नियंत्रण आणि भूक वाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो.

किती मीठ खावे

वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनाजेशनच्या सल्लानूसार आपण योग्य प्रमाणातच मीठ सेवन केले पाहीजे.त्यांनी सांगितलेले योग्य प्रमाण म्हणजे दिवसभरात २ ग्रॅम मीठ सेवन करणे कारण मानवी शरीराला दिवसभर फक्त ५०० मि. ग्रॅम सोडियमची गरज असते जी यातून भागविली जाऊ शकते.एक चमचा हिमालय मीठामध्ये ४०० मिग्रॅ सोडियमचे घटक असतात
एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या संशोधनानूसार भारतीय ब्लूएचओ ने दिलेल्या प्रमाणापेक्षा ११९ टक्के अधिक मीठ सेवन करतात.असे आढळले आहे की भारतीय लोक दिवसभरात १०.९८ ग्रॅम मीठाचे सेवन करतात जे दिलेल्या योग्य प्रमाणाच्या पाचपट अधिक अाहे.एक चमचा मीठ म्हणजे ६ ग्रॅम मीठाचे प्रमाण ज्यामध्ये २३०० मिग्रॅ सोडियम घटक असतात.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात अर्धा चमचा मीठाचे सेवन करणे योग्य असू शकते हे मात्र लक्षात ठेवा.
पोस्ट आवडल्यास नांवासह शेअर करा. पोस्ट लिहण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.
विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...