मुख्य सामग्रीवर वगळा

•  जिल्हास्तरावरील शासकीय कार्यालय स्पर्धेत
 
•   सहाय्यक संचालक नगर रचना अकोला शाखा कार्यालय राज्यातून प्रथम...

मुख्यमंत्र्यांनी केला निकाल जाहीर...
       
अकोला : राज्य शासनाच्या "१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत", राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल काल मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अकोला येथील सहाय्यक संचालक, नगर रचना कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, हा गौरव प्राप्त करणारे हे एकमेव नगर रचना कार्यालय ठरले आहे.





             अकोला येथील नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाने श्री. सादिक ग. अली, सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या कुशल नेतृत्वाखाली केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे हे यश शक्य झाले आहे. कार्यपद्धतीतील व्यावसायिकता, पारदर्शकता, वेळेवर सेवा पुरवण्याची कटिबद्धता आणि नवोन्मेषी दृष्टिकोन यांनी विभागाने राज्यभरात स्वतःची स्वतंत्र छाप उमटवली आहे.
तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या विभागाने बीपीएमएस (BPMS) प्रणालीचा प्रभावी वापर करून विकास प्रस्तावांचे जलद व पारदर्शक निराकरण साधले. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत शून्य प्रलंबित प्रस्ताव या उद्दिष्टाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. हे मॉडेल इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय ठरत आहे.
याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालयास नियमित अहवाल सादर करताना कोणतेही कायदेशीर बंधन नसतानादेखील उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची उच्चतम पातळी जपली गेली आहे.
"सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम, २००५" अंतर्गत, विभागाने नागरिकांच्या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळल्या, जलद प्रतिसाद दिला व उत्तरदायित्व सुनिश्चित केले. कार्यालयात आदरयुक्त, सर्वसमावेशक व प्रेरणादायी कार्यसंस्कृती निर्माण करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सेवाभाव निर्माण झाला आहे.
नकारात्मकतेतून यशाच्या शिखराकडे वाटचाल...
हे यश अधिक लक्षणीय ठरते, जेव्हा भूतकाळात या कार्यालयाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. कधीकाळी, हेच कार्यालय असे होते की जिथे अधिकारी बदलीने येण्यास कचरत होते; इतकेच नव्हे, तर काही अधिकाऱ्यांनी येथे नियुक्ती झाल्यावर स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा पर्याय निवडला होता. कार्यालयाच्या नकारात्मक प्रतिमेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
सध्या या सर्व नकारात्मकतेला पूर्णविराम देत, कार्यालयाने स्वतःचा कायापालट साधला आहे. आज सहाय्यक संचालक नगर रचना, अकोला या कार्यालयाचा संपूर्ण महाराष्ट्रात डंका वाजलेला आहे. एकेकाळी दुर्लक्षित असलेले हे कार्यालय आज उत्कृष्टतेचा प्रतीक बनले असून, कार्यक्षमतेचा नवा अध्याय लिहीत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अकोला नगर रचना कार्यालयातील संपूर्ण अधिकारी , कर्मचारी  टीमचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. राज्यात प्रशासकीय सुधारणांचा आदर्श घालून देणारे हे कार्यालय इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...