मुख्य सामग्रीवर वगळा

प्राध्यापक वाकुडकर यांच्या बहारदार प्रेम कवितांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.

  'लोकरंग'च्या सखे साजणी कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद
स्नेहभोजनाने झाली समारंभाची सांगता
अकोला: गेल्या वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अकोलेकरांना देणाऱ्या 'लोकरंग ' प्रतिष्ठान द्वारा आयोजित 'सखे साजणी' या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
 प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या बहारदार प्रेम कवितांनी रसिकांना चिंब केले... स्नेहभोजनाने या समारंभाची सांगता झाली.
          वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या लोकरंग परिवारातर्फे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आतापर्यंत करण्यात आले. सर्वप्रथम मधुरा वेलणकर यांचा ' मधुरव', त्यानंतर स्थानिक कलावंत सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांचा सार गाव मामाचं..., समीर चौगुले यांचा सम्या सम्या मैफिलीत माझ्या आणि गेल्याच महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा अभिनय असलेले 'शिकायला गेलो एक...' या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. 
       शनिवारी या वर्षातील शेवटचा कार्यक्रम सखे साजणी हा सादर करण्यात आला. लोकरंग चे सदस्य सहपरिवार या समारंभाला उपस्थित होते.
         प्राध्यापक वाकुडकर यांच्या बहारदार प्रेम कवितांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. आदर्श कॉलनीतील खंडेलवाल लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात सर्व सदस्य सहपरिवार सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर लोकरंगचे अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांनी सर्वांसाठी खास  स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
       समारंभाच्या सुरुवातीलाच केलेल्या प्रास्ताविकातून त्यांनी वर्षभरात सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली आणि सर्वांचा सहभाग आणि सहकार्याबद्दल आभार मानले.
         कार्यक्रमाचे संचालन किशोर बळी यांनी केले तर ॲड. सुधाकर खुमकर यांनी सर्वांचे आभार मानले.
०००००००००००००००००००००००००

SUPER NEWS 24    
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार

                  संवाद : 9371854706
        हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: or contact 9371854706



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...