तप, सेवा, सुमिरण या पद्धतीने आरोग्यदायी जीवन कसे जगायचे?
माझा अनूभव
आमचा तप, सेवा, सुमिरण या पद्धतीने आरोग्यदायी जीवन कसे जगायचे? या वरील अनुभव. मी भास्कर जामकर. रेणुका नगर, डाबकी रोड अकोला. मला शुगर आणि बी. पी. चा अतिशय त्रास होता. माझी शुगर 350,तर बी पी सुद्धा 250पर्यंत राहत असे.
रात्रीच दवाखान्यात जावे लागत असे. 2500रु. चा दरमहा खर्च होता.
कंटाळून गेला होता जीव.
एक दिवस शेगाव वारी करून आलो. एका वृत्तपत्रात डाॅ. सुरेश गाडगे काकांच्या lecture ची जाहिरात वाचली. लगेच ऐकायला गेलो.
आदरणीय काकांसोबत संपर्क करुन त्यांनी सांगितल्यानुसार तप, सेवा, सुमिरण या पद्धतीने जीवन कसे जगायचे
याचा सातत्याने त्यांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला. सराव करून घेतला. तिकडून आल्यावर काकांच्या सांगण्याप्रमाणे तप, सेवा, सुमिरण प्रणालीचा अवलंब दररोजच्या जीवनात केला. काय आश्चर्य... सातत्य आणि सरावाने मी आज एकदम ठणठणीत आहे. तंदुरुस्त आहे.
आणि आश्चर्य असे की, एका महिन्यात माझी शुगर नॉर्मल झाली. ती आजपर्यंत सुद्धा वाढत नाही. जवळपास आज अठरा वर्षे झाली. शुगर वाढत नाही आणि बीपी सुद्धा नॉर्मलच राहते. डॉक्टरची ऍलोपॅथीची कुठलीच गोळी न घेता आजही माझी शुगर नॉर्मलच आहे. बी पी सुद्धा नॉर्मलच आहे. हा माझा अनुभव मी सादर केला. धन्यवाद.
•लेखक•
भास्कर जामकर,
रेणुका नगर,
डाबकी रोड, अकोला.
Mob. 9881229848
8999149023


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा