मुख्य सामग्रीवर वगळा

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या मुलाखतीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणुका वेळेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाकडून व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.


‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत
     (जिमाका)
मुंबई, दि. ३१ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने केलेली तयारी, नियोजन तसेच मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती देणारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून प्रसारित होणार आहे.
        राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या मुलाखतीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणुका वेळेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाकडून व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदान केंद्रांची संख्या, ईव्हीएमची उपलब्धता, दुबार मतदारांबाबत घेतली जाणारी दक्षता तसेच मतदारांसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘मताधिकार’ मोबाईल अॅपमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याचे त्यांनी नमूद केले. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे विविध मतदार जागृती उपक्रम यावरही त्यांनी प्रकाश टाकला. मुलाखतीच्या शेवटी आयुक्त वाघमारे यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, 3, सोमवार, 5 आणि मंगळवार, 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून, ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवरही ती उपलब्ध राहणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 6 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदिका स्मिता गव्हाणकर यांनी घेतली आहे.
जयश्री कोल्हे/स.सं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...