•खंडेलवाल इंग्लिश स्कूल येथे आरोग्य तपासणी शिबिर
अकोला :
स्थानिक गोडबोले प्लॉट स्थित खंडेलवाल इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 28/11/25 रोजी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन(निमा) तर्फे डॉ. राजेश काटे, डॉ. राठी सर, डॉ.माई मॅडम, डॉ. चौधरी तसेच डॉ.तोष्णीवाल उपस्थित होते. वर्ग 3री ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. धनश्री पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉक्टरांना भेटवस्तू देऊन गौरवांकित करण्यात आले. शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्य विषयक समस्या डॉक्टरांना सांगितल्या व त्यावर डॉक्टरांनी उत्तमरीत्या उपचार सांगून अगदी शांततेत आणि उत्साहात तसेच शिस्तबद्ध पद्धतीने वैद्यकीय शिबिर संपन्न झाले.. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा