मुख्य सामग्रीवर वगळा

• नगर परिषद/नगरपंचायत निवडणुका २०२५


 नगर परिषद/नगरपंचायत निवडणुका २०२५ 
•अकोला पोलीस दल सज्ज — मतदान, मतमोजणी आणि संपूर्ण जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था
• ९ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी SP अकोला यांची पाहणी, स्ट्रॉंगरूम सुरक्षा, रूट मार्चेस, प्रतिबंधक कारवाई आणि अतिरिक्त बंदोबस्ताची अंमलबजावणी

अकोला : अकोला जिल्ह्यातील ५ नगर परिषद व १ नगरपंचायत निवडणुका दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडत असून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. सन २०१६ नंतर तब्बल ९ वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून सर्व प्रमुख पक्षांत तीव्र स्पर्धा आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका शांत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून मागील एक महिन्यापासून व्यापक पातळीवरील तयारी सुरु आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग व शासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार पोलीस अधीक्षक, अकोला यांनी जिल्हाधिकारींसह संयुक्त भेटी देत स्ट्रॉंगरूमची पाहणी, सुरक्षा मूल्यांकन आणि बंदोबस्त आराखड्यावर पुनरावलोकन केले. ईव्हीएम सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना राबविण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील संवेदनशील भाग, मिश्र वस्ती, पूर्वी जातीय वाद घडलेली क्षेत्रे तसेच बहुबुथ इमारती याठिकाणी पोलीस उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व SDPO व PSO यांनी स्वतः सर्व मतदान केंद्रांची पाहणी करून बंदोबस्ताची पडताळणी केली असून मतदान व मतमोजणी दोन्ही शांततेत पार पडतील याची खात्री केली आहे.

अकोला जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत — निवडणूक आकडेवारी एकूण नगरपरिषद/नगरपंचायत: ६ एकूण मतदान केंद्रे (PS): २४७ एकूण इमारती (PSL): १०० नगरसेवक पदांसाठी उमेदवार: ६८० नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार: ३८

       SST–FST–VST बंदोबस्त

एकूण १८ SST लोकेशन्स तयार करण्यात आले असून या टीमसाठी ११८ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

          प्रतिबंधक कारवाई

पूर्वी नगरपरिषद/मनपा/जिल्हा परिषद निवडणुकांमधील एकूण ६९ गुन्ह्यांतील ११० आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. १ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत : कलम १०७/११६(३) अंतर्गत: ९९५ कारवाया BP Act ५५: ०२, BP Act ५६: २५, MPDA: ०३, BNSS: ०१

अवैध दारू आणि शस्त्रांवर कारवाई

अवैध दारूविरोधात ३४२ मुद्देमाल नष्ट करीत रु. ३७,१६,१०५ किंमतीचा माल जप्त व नष्ट करण्यात आला.
आर्म्स ॲक्टअंतर्गत ०७ गुन्हे नोंदवून तलवार व सुरे अशी शस्त्रे जप्त केली.

    मतदान व मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यात खालील मनुष्यबळ तैनात : Addl SP – 01, SDPO – 04, PI – 22, API/PSI – 116, पोलीस कर्मचारी – 2300, होमगार्ड – 600, SRPF – 1 कंपनी. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस, SRPF, RCP सेक्शन्स तैनात केली जाणार आहेत.
एकूण २४७ मतदान केंद्रांपैकी १२४ संवेदनशील म्हणून वर्गीकृत. प्रत्येक सेक्टरवर १ अधिकारी + ५ पोलीस कर्मचारी + ५ होमगार्ड अशी सेक्टर पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमधून १ अधिकारी व १० कर्मचारी रिझर्व ठेवले जातील.

      रूट मार्चेसद्वारे मनुष्यबळ प्रदर्शन

मतदान आणि मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलाने स्थानिक पोलीस व बाहेरील तुकड्यांसह संयुक्त रूट मार्चेस सुरु केले आहेत. आजपर्यंत अकोट, मुर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व हिवरखेड शहरांत मोठ्या प्रमाणावर रूट मार्चेस घेण्यात आले असून पुढील दोन दिवसांत संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस सज्ज असल्याचा संदेश देण्यात येत आहे. 

शांत, भयमुक्त मतदानासाठी नागरिकांना आवाहन
अकोला जिल्ह्यातील सर्व मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजवावा, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुक्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही आक्षेपार्ह प्रकार, गैरकृत्य किंवा संशयास्पद घटना दिसल्यास नागरिकांनी डायल ११२ वर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा. आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा
 9371854706
 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


👆👆👆👆👆👆👆👆



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...