मुख्य सामग्रीवर वगळा

महसूल पंधरवाड्यानिमित्त


          प्रशासनातील दीपस्तंभ

नवं नव्या संकल्पनाचे जनक 
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

                लेखक

          प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे 
             संचालक,मिशन आयएएस 
             अमरावती कॅम्प 
              संवाद :  9890967003



ज प्रशासनात राहून लोकाभिमुख कार्य करून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी राहून विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणे हे सोपे काम निश्चितच नाही. पण काही सनदी अधिकारी असे असतात की जे तन-मन-धनाने शासकीय सेवा करीत असतात. लोकाभिमुख व लोकोपयोगी कार्य हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. अशाच एका अधिकाऱ्याचे नाव आहे श्री दिलीप स्वामी. त्यांना यावर्षीचा आधुनिक संकल्पना निर्माण केल्याबद्दल व त्या यशस्वीपणे संभाजीनगर मध्ये राबविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षीच्या महाराष्ट्र दिनाला गौरविले आहे.

कल्पक जिल्हाधिकारी 

संभाजीनगर सारख्या शहराचे जिल्हाधिकारी पद सांभाळणे म्हणजे अवघड काम. पण ते श्री दिलीप स्वामी साहेबांनी अतिशय कौशल्याने हाताळले. त्यांच्या डोक्यात नेहमी नवीन नवीन कल्पना येतात आणि त्या त्यांनी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या इतर विभागामध्ये प्रामाणिकपणे सातत्याने व सचोटीने राबविल्या म्हणून शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून पहिल्या क्रमांकाचे आधुनिक संकल्पना पारितोषिक देऊन गौरविण्याचे ठरविले आहे. सनदी अधिकारी म्हणून कार्यरत करत असताना सतत लोकाभिमुख राहावे लागते. लोकाभिमुख कामे करावी लागतात. म्हणजे त्यामुळे जनता दरबार नेहमी अशा अधिकाऱ्यांचे पाठीशी उभे राहत असतो. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना ते कौशल्य अवगत झाले आहे. 

उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन 

श्री दिलीप स्वामी जिथे जिथे जातात तिथे तिथे अभिनव आधुनिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात त्यांच्या हातखंडा आहे. संभाजीनगरला जिल्हाधिकारी म्हणून येण्यापूर्वी ते सोलापूरला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा परिषदेचा चेहरा मोहराच बदलून टाकला .तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचा काया पालट केला .प्रत्येक शिक्षकाला सतर्क केले प्रशिक्षित केले आणि लोकाभिमुख केले. या उपक्रमांमध्ये पारितोषिक वितरण करण्यासाठी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सोलापूरला आले आणि त्यांनी दिलीप स्वामी साहेबांचा लेखाजोखा पाहिला .तेव्हा सोलापूर जिल्हा परिषद हा जो उपक्रम राबवित आहे तो संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये राबविण्यात यावा असा अनुकूल अभिप्राय दिला. एका राज्याचे उपमुख्यमंत्री गावात येतात काय  ? स्वामी साहेबांचे काम पाहतात काय आणि स्वामी साहेबांना त्यांनी राबविलेला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे आश्वासन देतात काय ही खरोखरच गौरवाची गोष्ट आहे .

शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातल्या त्यात यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा उच्चांक गाठलेला जिल्हा आहे .या जिल्ह्यांमध्ये पुसद हया श्री वसंतराव नाईक व श्री सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री राहिलेल्या मोठ्या व्यक्तींच्या गावात त्यांची उपविभागीय अधिकारी म्हणून जेव्हा निवड झाली तेव्हा त्यांनी पहिल्या क्रमांकावर शेतकरी निवडला. शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटले .त्यांचे मेळावे घेतले. प्रसंगी त्यांच्या घरीही गेले. त्यांना सकारात्मक केले आणि अनुकूल वातावरण तयार केले .त्यामुळे त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आणि महाराष्ट्र शासनाने प्रसार माध्यमाने सनदी अधिकाऱ्यांनी तसेच मंत्रालयातील मंत्र्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केले. एवढेच नाही तर महाराष्ट्राचे आयडॉल या गौरव ग्रंथामध्ये त्यांच्या कार्याची नोंद घेतली गेली l. जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंग  से करते है . असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.

जिल्हाधिकारी चक्क  बंडित
 
एक उपक्रमशील लोकाभिमुख आणि सदैव हसरा चेहरा असणारा जिल्हाधिकारी म्हणून श्री दिलीप स्वामी साहेब यांचा नावलौकिक आहे. प्रसंगी चार चाकी गाडी प्रसंगी मोटरसायकल आणि परवा तर त्यांनी कमालच केली. ज्या बोरगाव गावात त्यांना जायचे होते. त्या गावाला जाण्यासाठी रस्ता चांगला नव्हता . पांदन रस्ता होता.चार चाकी गाडीही जाऊ शकत नव्हती .अशा वेळेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून चक्क बंडीने प्रवास केला. बंडी ने प्रवास करून त्या गावाला पोहोचलेला सदीप सनदी अधिकाऱ्यांच्या यादीतील हा पहिला सनदी अधिकारी असावा. त्या बोरगाव गावकऱ्यांना किती आनंद झाला असेल त्यांचे प्रश्न सोडवायला विलंब लागेल पण आपले प्रश्न पाहण्यासाठी आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी बंडी मधून येतात ही बाब त्या बोरगाव गावातील लोक कधीही विसरू शकणार नाहीत. संभाजीनगर जिल्ह्यातील बोरगावचे रहिवासी हा प्रसंग आपल्या हृदय पटलावर करून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत .

जिथे जातो तेथे माझा सांगाती 
    
   श्री दिलीप स्वामी यांच्या प्रशासकीय जीवनाची सुरुवात उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे झाली. इथेच त्यांचा माझा परिचय झाला व तो आजही कायम आहे .साहेब बदली होऊन बुलढाणा नांदेड सोलापूर पुसद अशा वेगवेगळ्या गावात गेले. त्यांचा बराचसा कालखंड हा अमरावतीमध्ये गेला आणि आता तर ते चक्क अमरावतीकर म्हणून ओळखल्या जाऊ लागले. अमरावतीचा अंबा फेस्टिवल असो की कुठलाही कार्यक्रम असो दिलीप स्वामी साहेब त्या कार्यक्रमाला येतात .अमरावती येथील मित्रांची संस्थांची प्रशासकीय संस्थांची त्यांची घट्ट नाळ जुळली आहे. ते इतके तन मन धनाने काम करतात की हा माणूस आमच्याच गावचाच आहे आमच्याच नात्यातला आहे आमच्या सुखदुःखांना समजून घेणारा आहे असा आत्मविश्वास लोकांमध्ये तयार होतो आणि त्यांच्याशी जवळी पण साधल्या जाते .अमरावतीमध्ये आज स्वामी साहेबांचे अनेक मित्र त्यांचे नातेवाईक झाले आहेत. आमचे मित्र श्री ओम प्रकाश चर्जन हे त्यांच्या सतत संपर्कात असतात. त्यांचे अमरावतीचे गेट-टुगेदर ते घडवून आणतात .

रस्ता बंद पण स्वामी पोहोचले 

साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. साहेब तेव्हा उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावतीला कार्यरत होते. तेव्हा शेतकरी संघटना अतिशय प्रबळ होती. साहेबांचा एक कार्यक्रम आम्ही अमरावती जिल्ह्याची अंजनगाव सुरजी येथे ठेवला होता .कार्यक्रम विदर्भस्तरीय होता. साहेबांच्या हस्ते उद्घाटन होते. पण नेमके ज्यावेळेस उद्घाटन होते त्याच दिवशी शेतकरी संघटनेने बंद पुकारला. रस्ता रोको आंदोलन पुकारले .साहेब ज्या रस्त्याने येणार होते त्या आसेगाव पूर्णाला नदी लागत होती आणि नदीच्या पुलावरील दोन्ही टोकाला शेतकरी संघटनेचे नेते रस्ता अडवून होते. मी साहेबांना फोन केला. साहेब म्हणाले. मी बरोबर वेळेवर पोहोचतो .मी म्हटलं साहेब तुम्ही कसे पोहोचणार .रस्ता तर दोन्ही बाजूने बंद आहे. ते म्हणाले. मी पूर्ण नियोजन केले आहे. मी कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी पोहोचतो आणि खरोखरच साहेब कार्यक्रमाच्या  अर्धा तास आधी अंजनगावच्या विदर्भ संत साहित्य संमेलनाला पोहोचले. या ठिकाणी त्यांनी आपली कल्पकता लढवली . ते अमरावती ते आसेगाव  पूर्णा या गावा पर्यंत शासकीय वाहनाने आले. शासकीय वाहन तिथं  पार्क केले आणि तिथून पुलाच्या पलीकडे चालत गेले. पुलाच्या पलीकडे त्यांनी दुसरे वाहन बोलावून ठेवले होते आणि त्या दुसऱ्या वाहनात बसून ते अंजनगाव सुर्जीच्या कार्यक्रमाला आले. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीच लागेल . असा हा कल्पक अधिकारी आहे.

आधुनिक संकल्पना 

श्री दिलीप स्वामी साहेब संभाजीनगरला रुजू झाल्यापासून विविध उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत .त्यांच्याबरोबर पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय हे लोकाभिमुख झाले आहे. सक्रिय झालेले आहे. असेच प्रयोग यापूर्वी सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी संभाजीनगर येथे राबविले आहेत. दिलीप स्वामी साहेब हे श्री रवींद्र जाधव डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या तालमीत तयार झालेले .अतिशय कल्पकता त्यांच्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या संकल्पना नेहमी त्यांच्या डोक्यात येतात आणि संभाजीनगरला रुजू झाल्यापासून त्यांनी त्या संकल्पना प्रत्यक्ष संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. प्रसार माध्यमांनी लोकांनी त्यांच्या या लोकाभिमुख उपक्रमाची दखल घेतली आणि ती महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचली. महाराष्ट्र शासनाने देखील या तत्पर तेजस्वी व तपस्वी अधिकाऱ्याचा महाराष्ट्र दिनाला गौरव करण्याचे ठरविले आहे आणि म्हणून त्यांना विभागातील  आधुनिक संकल्पना राबवल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित करून महाराष्ट्र शासनाने या तत्पर आणि आधुनिक संकल्पना आपल्या कार्यालयात राबवणाऱ्या अधिकाऱ्याचा महाराष्ट्र दिनी गौरव केला आहे
. त्यांना प्राप्त झालेल्या या गौरवाबद्दल
 त्यांचे हार्दिक अभिनंदन व  महसूल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...