(ध्यान मुद्रेत जिल्हाधिकारी अजित कुंभार)
•जागतिक योगदिनात मान्यवरांचा सहभाग
अकोला दि २१: ’एक पृथ्वी व एक आरोग्यासाठी योग महत्वाचा’ हा संदेश देत जिल्हा प्रशासन व क्रीडा कार्यालयातर्फे आज योग प्रात्यक्षिकांनी योग दिन साजरा करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात जिल्हास्तरीय योग प्रात्यक्षिकांचे आयोजन सकाळी करण्यात आले. त्यात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
आंतरराष्ट्रीय योगदिनामध्ये
सहभागी संस्था
आयुष मंत्रालय भारत सरकार, अकोला जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अकोला, मेरा युवा भारत केंद्र-अकोला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (डॉ.पं.दे.कृ.वि.),शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, एन.सी.सी., स्काऊट गाईड, होमगार्ड, पतंजलि योग समिती, आर्ट ऑफ लिविंग, योग भारती, क्रीडा भारती, अकोला योग परिषद, योगासन व सांस्कृतीक मंडळ, प्रजापिता ब्रह्मकुमारी, संत निरंकारी मंडळ, विश्वमांगल्य सभा, वाहे गुरु सेवासमिती, स्वामी श्री वाटीका समिती, सिंधू ज्येष्ठ नागरिक मंडळ , मॉर्निंग योगा ग्रुप.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा