मुख्य सामग्रीवर वगळा

 


•  सुखाची वृध्दि आणि दुःखाची संपूर्ण निवृत्ती करण्याचे सामर्थ्य वेदांमध्ये आहे



•  नाथशक्तिपीठाधीश प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचे प्रतिपादन

•  श्री प्रल्हादाश्रम वेद पाठशाळेचे उद्घाटन 



अकोला : सामान्यांचे सुखाची वृध्दि आणि दुःखाची संपूर्ण निवृत्ती करण्याचे सामर्थ्य वेदांमध्ये आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक मनुष्य मात्राच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास वेद मंत्रांना सहज साध्य आहे, असे प्रतिपादन अध्यात्मयोग महर्षि नाथशक्तिपीठाधीश प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी येथे केले. ते नाथशक्तिपीठ आणि श्री दत्त मंदिर जुने शहर अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या श्री प्रल्हादाश्रम वेद पाठशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  

        वेद हे सबंध जीवसृष्टीचे नियंत्रण आणि संचालन करीत असल्यामुळे वेदांच्या माध्यमातून भाग्याचे पुनरूज्जीवन शक्य आहे.  नाथशक्तिपीठ अकोला गेल्या ३२ वर्षांपाून वेदमंत्रांच्या माध्यमातून हे कार्य करीत आहे.  मात्र वेद मंत्रांच्या उपयोजनासाठी श्रीगुरुंना शरण गेल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी शेवटी म्हटले.

विवेक गोडबोले शास्त्री

वेदांचे विश्व खूप मोठे आहे ही जिज्ञासा भक्ती आहे चिरस्थायी अक्षरांचा समूह म्हणजे वेद आणि अक्षर हे ब्रह्म आहे. चारही वेदांचे कार्य स्वतंत्र आहे.  वेद हे विश्वव्यापी आहेत प्रत्येकाने याचा अभ्यास करावा असे आवाहन साताराचे वे. शा. संपन्न विवेक शास्त्री गोडबोले यांनी येथे केले.  

       नाथशक्तीपीठ आणि जुने शहरातील श्री दत्त मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने  दुसऱ्या चतुर्वेद पाठशाळेचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते. 


        श्रीकांतशास्त्री गदाधर

       नाथशक्तीपीठाधिश पु.नरेंद्रनाथ महाराज यांनी 28 वर्षांपूर्वी  पहिल्या वेद पाठशाळेचा शुभारंभ केला.  त्यातून सुमारे 450 विद्यार्थी घडले.    ही दुसरी शाखा सुरू करताना विशेष आनंद होत असल्याचे श्रीकांतशास्त्री गदाधर यांनी प्रास्ताविकातून सांगितले. 

         सेवानिवृत्त न्यायमूर्ती बाळासाहेब मेहरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डोळे मिटून जे दिसतं ते ज्ञान तर उघड्या डोळ्यांनी जे दिसतं ते विज्ञान वेद हेच विज्ञान आहे,  हे सर्वांनी समजून घ्यायला हवे असे विचार यावेळी मेहरे यांनी व्यक्त केले. 

      श्री गणेश यागाने  सकाळी आरंभ झाला.  दीपप्रज्वलन, फलकाचे अनावरण, दानदात्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  सर्वांचे स्वागत संतोष जोशी यांनी केले.

     कार्यक्रमाचे संचालन प्रा गजानन कुळकर्णी यांनी केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...