कस्तुरी ची "वारी शिक्षणाची "
येत्या ३ जुलै रोजी...
लेखक :
अॕड. प्रा. किशोर बुटोले
'कस्तूरी' संस्थापक
दरवर्षी आषाढ महिना आला की
संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूर ची
वारी करत असतो.. आषाढी एकादशी ला विठू माऊलीचं दर्शन करून हा वारकरी सुखावत असतो असं असतांना कस्तुरी परिवारातील संवेदनशील माणसं मात्र मेळघाट परिक्षेत्रातील अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत शिकणाऱ्या गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनाचा वेध घेत ' वारी शिक्षणाची' या उपक्रमाच आयोजन करून अशा वंचित व गरजू आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात व्यस्त असतात .
जणू विठू माऊलीचं दर्शन या गोरगरीब व गरजू आदिवासी मुलांमध्ये घेऊन स्वतःला धन्य मानून घेता..
दरवर्षी शालेय शिक्षणाची सुरुवात जून/ जुलै महिन्यात होताच कस्तुरी हा उपक्रम घेत असते. शासनाच्या शिक्षण विभागाकडून या मुलांसाठी पाठ्यपुस्तके, गणवेश इ. सुविधा पुरविल्या जातात परंतु स्कूल बॅग्स , पाटी लेखन, वही , कंपास , पाणी बॉटल , पेन पेन्सिल, रबर इ. साहित्य कोठून आणायचं या विवंचनेत गरीब आदिवासी पालक असतांनाच कस्तुरी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मेळघाट परिक्षेत्रातील गरीब व आदिवासी गावांपर्यंत 'वारी शिक्षणाची' हा उपक्रम राबवित असते..
यावर्षी कस्तुरीने येत्या ३ जुलै रोजी ' वारी शिक्षणाची' या उपक्रमाचे आयोजन केले असून मेळघाट परिक्षेत्रातील अत्यंत दुर्गम , शहरी वातावरणा पासून कोसोदुर असलेली गावे चौऱ्यामल, काकादरी ,रुईपाठा, सत्ती, पिपादरी इ .जि प च्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ३०० आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल.
यामध्ये स्कुल स्कूलबॅग , पाणी बॉटल, वही ,पेन ,पाटी , लेखणी, पेन्सिल रबर, स्केल इ. साहित्याचा समावेश आहे .
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आदिवासी कुटुंब जिवन जगत असतांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यातल्या त्यात मुलांना शैक्षणिक सुखसोयी व साहित्यांचा अभाव हि बाब लक्षात घेऊन कस्तुरी मागील अनेक वर्षांपासून ' वारी शिक्षणाची' या उपक्रमाचे आयोजन करीत असते.
चिखलदरा पंचक्रोशितील शाळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करत असताना सदर गावे अत्यंत पहाडी भागात असून सदरच्या गावांमध्ये रस्ते , दवाखाने , बाजारपेठ इ. साधने नसून आजपर्यन्त कुठलिही सेवाभावी संस्था अम्हाला मदत करायला आली नाही अशा प्रतिक्रिया येथील शिक्षकांनी दिल्या.
वंचित व निराधारांच्या उत्थानासाठी प्रयत्नरत असणाऱ्या कस्तुरीच्या वारी शिक्षणाची या अभिनव उपक्रमासाठी कस्तूरी प्रेमी व समाजबांधवांनी सहभागी होऊन यथायोग्य योगदान देऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे असे आवाहन कस्तूरी चे संस्थापक प्रा. किशोर बुटोले व प्रकल्प प्रमुख संजय गायकवाड यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा