अकोला :
'' संकल्प ते सिद्धि ' या संकल्पनेस मूर्त रूप देऊन महाराष्ट्रास प्रगतीपथावर नेणारे महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची एक भव्य सभा बुधवार दि. 11 जून 2025 रोजी दुपारी १ वाजता स्थानिक क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. अकोल्याच्या राजेश्वर नगरीत होणारी ही ऐतिहासिक सभा यशस्वी करण्यासाठी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, शहराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल आदी भाजपाचे नेते जीवाचे रान करीत आहेत. याच संदर्भात भाजप पक्षाच्या मुख्य कार्यालयात आमदार रणधीर सावरकर यांनी छावा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक संवाद सभा आयोजित केली होती.
या संवाद बैठकीत आमदार सावरकर यांनी छावा च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मा. मुख्यमंत्र्यांच्या सभे बाबत मार्गदर्शन केले व हजारोंच्या संख्येत या सभेत उपस्थित राहण्याचे आणी विशेष करून युवा वर्गाने या सभे चा लाभ घेण्याचे आवाहन केले. छावा संघटनेच्या या '' युवा जोडो " संकल्पनेतून आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदींच्या निवडणुकीत संघटनेस चांगला लाभ होऊ शकतो असेही याप्रसंगी आमदार सावरकर यांनी आवर्जून सांगितले .
याप्रसंगी छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत मसणे, भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, मनिराम ताले यांनीही मार्गदर्शन केले. छावाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत याप्रसंगी उपस्थित होते. मा. मुख्यमंत्र्यांचे सभेकरिता छावाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी ग्वाही याप्रसंगी शंकरराव वाकोडे यांनी दिली.
🔴🔵🔴🔵🔷🔴🔵🔴🔵🔷🔴🔵🔴🔴
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा