मुख्य सामग्रीवर वगळा

• सौम्या शर्मा तत्पर सनदी अधिकारी 
•  अमरावती मनपाचे नवे आयुक्त


                   लेखक : 
        •  प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे 
            संवाद : 9890967003


नदी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या दालनात शिरण्यापूर्वी मी अभ्यागात कक्षामध्ये नजर टाकली. स्वागत कक्षामध्ये पुस्तके ठेवली होती.  त्याचप्रमाणे त्या दिवसाचे वर्तमानपत्र ठेवले होते. याशिवाय फुलांचा एक शो पीस गुच्छ पण ठेवला होता. पुस्तके पाहून मला चांगलेच वाटले. मी पुस्तके चाळली. ती वाचनीय होती. तेवढ्यात बेल वाजली. मॅडमनी मला आत बोलावले होते. मी माझ्या बरोबरचे सहकारी श्री प्रशांत भाग्यवंत सोनाली बुंदे श्री अनिल  मोहोड यांना घेऊन आतमध्ये गेलो. मॅडमनी आम्हाला बसायला सांगितले. 
         आणि खुर्च्यावर बसताच पाणी आले.  मी विभागीय आयुक्त मॅडमनी दिलेला कागद सौम्या मॅडमकडे सोपविला. मॅडम म्हणाल्या मला आत्ताच कमिश्नर मॅडमचा फोन आलेला आहे. त्यांनी मला आपल्याबद्दल सांगितले आहे. आपण हा उपक्रम आपल्या परिसरामध्ये राबवू. 
    त्यांनी लगेच फोन करून शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री रवींद्र काटोलकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती गुरव यांना बोलावून घेतले. आमचा मिशन  आय.ए.एस.चा प्रकल्प पूर्ण समजावून घेतला. संबंधित उपक्रम आपल्या विभागात राबवायच्या आहे, असे त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले. आम्ही सौम्या मॅडमचा निरोप घेतला. 
       काही कारणास्तव मी नागपूरला गेलो होतो. सौम्या शर्मा तेव्हा नागपूरला नागपूर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. आम्ही नेहमीप्रमाणे कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांना भेटावयास नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गेलो. मिशन आयएएस हा उपक्रम आम्हाला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या 6 जिल्ह्यात राबवायचा होता. त्यासाठी मी रितसर पत्र विभागीय आयुक्त नागपूर यांच्या नावाने टंकलिखित करून आणले होते. विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरीमॅडमची अगोदरच वेळ घेतल्यामुळे त्यांची लगेच भेट झाली. त्यांना आमचा हा प्रकल्प आवडला. त्या म्हणाल्या आपल्या नागपूर जिल्ह्यापासून सुरुवात करू या. तुम्ही असं करा आमच्या कार्यालयाच्या बाजूलाच नागपूर जिल्हा परिषद आहे. तिथे सौम्या शर्मा आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या आहेत. असे म्हणून त्यांनी फोन उचलला. आणि फोनवर लगेच सौम्या शर्मा यांना हा प्रकल्प नागपूर विभागात राबविण्याचा सूचना केल्या. बिदरीमॅडम म्हणाल्या तुम्ही असं करा हे पत्र असेच असे सौम्या शर्मा मॅडमकडे घेऊन जा. मी त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत. 
        आम्ही बिदरीमॅडम कडील चहापाणी आटोपल्यावर नागपूर जिल्हा परिषद परिसरात गेलो. नागपूरची जिल्हा परिषद ही विभागीय आयुक्त कार्यालयाला लागूनच आहे. मी माझे विजिटिंग कार्ड आत मध्ये पाठवले. तोपर्यंत आम्ही स्वागत कक्षाचे निरीक्षण केले.   
सौम्या शर्मा मॅडमनी मिशन आयएएस नागपूर जिल्ह्यात राबविण्यासाठीचा तत्पर निर्णय घेतला होता. 
म्हणतात ना, 
जितने वाले कोई अलग काम नही करते 
वहा हर काम अलग ढंग से करते है 

     गेल्या दोन वर्षात आम्ही अमरावती जिल्ह्याबरोबर नागपूर जिल्हा त्याचबरोबर नागपूर विभागातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्पर्धा परीक्षा कार्यशाळांसाठी पिंजून काढला.  आमच्या या उपक्रमात माझी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई ह्या देखील सहभागी झाल्या होत्या.  नागपूर जिल्हा म्हणजे मोठा जिल्हा.  पण श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मिशन आय ए एस हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात व विभागात सुरू झाला. 
        नागपूर विभागात कार्यक्रम म्हणजे राहणे जेवणे आले. वाहनाचा खर्च आला. आमच्या नियमात तर आम्ही मानधन प्रवास खर्च घेत नाही. पण या कामात आमचे नागपूरचे मित्र मदतीला आले. नागपूरचे अपर आयुक्त श्री रवींद्र ठाकरे, महाज्योतिचे महासंचालक श्री राजेश खवले, उपायुक्त श्री कमल किशोर फुटाणे, कर्नल राजू पाटील, महाराष्ट्र बँकेचे श्री मोहन टोंगे,  सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अरविंद गिरी, पोलीस निरीक्षक श्री संजय पांडे,  प्रा. रमेश पिसे, अनिल आसेगावकर, अनिल मोहोड, प्रशांत भाग्यवंत, सोनाली बुंदे, अभिजीत मानकर, डॉ. यादव,  कुलगुरू प्रकाश घवघवे, कुलगुरू सुभाष चौधरी,  मा आर टी ओ अधिकारी श्री शरद जिचकार, आर टी ओ अधिकारी श्री रवींद्र भुयार हे मदतीला आले. 
        आणि एक चांगला प्रकल्प  अमरावती बरोबर नागपूर विभागातही सुरू झाला. या चांगल्या प्रकल्पाची सुरुवात झाली ती श्रीमती सौम्या शर्मा यांच्या पुढाकाराने. आज सौम्या शर्मा अमरावतीला महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाल्या आहेत. रुजू झाल्याबरोबर मावळते आयुक्त श्री सचिन कलंत्रे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना रितसर कार्यभार दिला. सौम्या शर्मा व त्यांचे यजमान अर्चित चांडक हे दोघेही चांगल्या गोष्टीसाठी समाज माध्यमावर चर्चेत आहे. श्री अर्चित चांडक हे अकोला येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असून परवाला अमरावती पोलीस आयुक्तालयात ते नवीन पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया यांना भेटून गेले. तेव्हा अमरावतीच्या पोलीस आयुक्तालयात भेटीचा योग आला होता .
अमरावती शहराला एक चांगला कर्तव्यदक्ष तत्पर महानगरपालिका आयुक्त लाभल्याबद्दल अमरावतीकर भाग्यवान आहेत. आतापर्यंत सौम्या शर्मा यांनी आपल्या अल्प कालावधीमध्ये आपल्या कामाची झलक नागपूर विभागामध्ये रुजविली आहे. अमरावती शहराचा कायापालट करण्यामध्ये त्यांची निश्चितच आयुक्त म्हणून महत्त्वाची भूमिका राहील. आपण देखील अमरावतीकर नागरिक म्हणून त्यांच्या चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे. 

        •  प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे 
     संचालक, मिशन आयएएस अमरावती
          संवाद : 9890967003


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...