मुख्य सामग्रीवर वगळा



• कडू कारल्याचे गुणकारी फायदे
             •आरोग्य धनसंपदा

🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴
                  
   🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴        
                   संकलन-संपादन-शब्दांकन
                    : विजय द. केंदरकर
🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵

 🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵

      हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत.

१)  कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते.
२)  दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची भाजी काही ही मसाले ना वापरता देखील भाजी बनवून खाल्याने फायदेशीर ठरतात.
३)  पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे चांगलेच असते, जेणे करून आपल्यापासून हे आजार लांबच राहतं.
४)  कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात. कावीळ मध्ये देखील हे फायदेशीर आहे.
५)  कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात.
६)  उलट्या, जुलाब, किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याचा रसात काळंमीठ टाकून प्यायलास लगेच आराम मिळतो. जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो.
७)  अर्धांगवायूचा त्रास झाला असेल तरी ही कारलं खाणे खूप प्रभावी उपाय आहे. त्यात कच्च कारलं रुग्णासाठी फायदेशीर आहे.
८)  रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृता सारखे आहेत. मधुमेहाचा आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे. मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचे रस, तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
९)  रक्ताळ मूळव्याध झाली असल्यास 1 चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासात आराम मिळतो.
१०)  संधिवात किंवा हातपायाची जळजळ होत असल्यास कारल्याच्या रस चोळणे फायदेशीर असतं.
११)  मूत्रपिंड (किडनी)च्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात. ह्याचा सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते.
१२)  हृदयाच्या विकारांसाठी कारलं हे रामबाणच आहे. हे हानिकारक चरबीला हृदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही. यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता नसते.
१३)  लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात, आणि त्वचेचे आजार होत नाही.
१४)  कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷
🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵

       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...