• वीज पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घ्या
• आमदार रणधीर सावरकरांनी घेतला विद्यूत वितरण व्यवस्थेचा आढावा
अकोला : येथील महावितरणच्या कार्यालयातील विद्युत भवनामध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता ते लाईनमनपर्यंत यांचेसोबत अकोला पूर्व मतदार संघातील अकोट महावितरण विभागांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा बाबतच्या गाव निहाय सविस्तर तक्रारीसह विद्युत वितरण व व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
आढावा सभेला महावितरण मुख्य अभियंता नाईक, अधीक्षक अभियंता शंभरकर, कार्यकारी अभियंता उईके, कार्यकारी अभियंता सपकाळे, उपअधीक्षक अभियंता इन्फ्रा सोनावणे, कार्यकारी अभियंता दिनोरे, आदींसह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडतांना सांगितले की, मागील एक महिन्यापासून विविध भागात सतत वीज खंडित होऊन रात्र अंधारात काढावी लागते. तसेच गरमीचा त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, याकरिता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. या बाबत यापुढे कोणतीही तक्रार ऐकून घेतल्या जाणार नाही. तसेच महावितरणच्या काही समस्या असल्यास अशा समस्या लोकप्रतिनिधी म्हणून मला अवगत कराव्या. त्याबाबतचा पाठपुरावा शासन स्तरावर करण्यात येऊन समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आमदार रणधीर सावरकर यांनी आश्वस्त केले.
चोहोट्टा नवीन सब स्टेशन तयार करणे,दहीहांडा फाटा ते केळीवेळी या दरम्यान लाईन टाकण्याचे काम, गांधीग्राम ते कुटासा ते केळीवेळी या लाईनवर फिडर सेपरेशनचे काम, तुटलेल्या तारा व वाकलेले खांब सरळ करणे, गांधी स्मारक तसेच काटी येथे AB स्वीच लावणे, कुटासा येथील वाढीव क्षमतेचे रोहित्र लावणे, पिंपरी येथे नवीन मंजूर केलेल्या सब स्टेशनचे काम तातडीने सुरु करणे इत्यादी समस्यावर चर्चा करण्यात आली.
कुटासा येथील शासनाने पावर ट्रान्सफार्मरच्या कामाचा कार्यारंभ आदेश सन २०२३ मध्ये दिला असून अद्याप पर्यंत काम न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, तसेच कामात दिरंगाई केल्याबाबत आमदार सावरकर यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करून अशा अनियमितता खपवून घेतल्या जाणार नाहीत. कामात झालेल्या दिरंगाई बाबत आमदार सावरकर यांनी संचालक प्रकल्प तालेवार, प्रकाश गड मुंबई यांचे सोबत संपर्क साधून सर्व वस्तुस्थिती सांगितल्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.
बैठकीला भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष शिवरकर, विठ्ठल वाकोडे, राजेश नागमते, किशोर बुले, विवेक भरणे, संदीप उगले, अंबादास उमाळे, बाळू गावंडे, गोपाल वावरे, राजेश झामरे, विजय सोळंके, दत्तू पाटील, विनोद मगळे, किशोर सरोदे, मनीष मोडक, प्रवीण दिक्कर, दादाराव पेठे, दिलीप सुल्ताने, चेतन डोईफोडे, बाळू बाप्पू देशमुख, उमेश पवार, आशिष भोंडे, अशोक झामरे, उमेश पवार, अनिल गावंडे, निलेश वहिले, विठ्ठल चतरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा